आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Objectionable Photo Of Praniti Shinde, One Person Arrested

प्रणिती शिंदे यांच्या छायाचित्राचा आक्षेपार्ह डिजिटल फलक बार्शीत लावल्याप्रकरणी एकास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे यांच्या छायाचित्राचा आक्षेपार्ह डिजिटल फलक बार्शीत सार्वजनिक ठिकाणी लावल्याप्रकरणी माजी नगरसवेक अतुल इटकर यांना अटक झाली आहे. तर डिजिटल फलक तयार करून देणाऱ्या माँटी शिंदे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला.प्रणिती शिंदे यांचे स्वीय सहायक अप्पाराव जोशी (रा. अशोक नगर, सोलापूर) यांनी तक्रार दिली. त्यावरून बार्शी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे.

धर्मवीर रामभाऊ आबा पवार मार्गावरील मोरे रिक्षा स्टॉप येथे लावण्यात आलेल्या डिजिटलवर प्रणिती शिंदे यांचे छायाचित्र आक्षेपार्ह मजकूर लिहून बदनामी केल्याची माहिती मिळाल्यानंतर जोशी यांनी खात्री करून पोलिसांत फिर्याद दिली आहे. इटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील मुक्ताई डिजिटलचे माँटी शिंदे यांच्याकडून सदरचे डिजिटल तयार करून घेतले होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे हे करत आहेत.