आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या त्या मुलींच्या पालकांना सोलापुरात चौकशीसाठी बोलावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोणार्क एक्स्प्रेसमधून मुंबईला घेऊन जाणाऱ्या आेडिशातील त्या मुलींना त्यांच्याच आई -वडिलांनी काम करण्यासाठी पाठविले होते. त्यापोटी एका व्यक्तीने त्यांना काही पैसे दिले होते. नोकरीच्या अामिषाने मुंबईत नेण्यात येत होते की वाममार्गाला लावण्यासाठी ती व्यक्ती नेत होता, याचा निष्कर्ष पोलिस काढत अाहेत. एक पथक अोडिशात जणार अाहे. संशयित व्यक्ती अाणि अाई- वडिलांच्या चौकशीतून सत्य बाहेर येईल.

सोमवारी मध्यरात्री लोहमार्ग पोलिसांकडे शहर पोलिसांकडून हा गुन्हा वर्ग झाला. नऊ मुलींपैकी दोन मुलींची मंगळवारी लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केली. त्यातून मुलींना पालकांनी पैसे घेऊन विकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पण हा मुद्दा अजून चौकशीत स्पष्ट व्हायचा अाहे. त्या मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले.
ओडिशा राज्यातील गजपती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्या मुली अाहेत. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक अाहे. ज्या दोन दलांलासोबत त्या मुली मुंबईला जात होत्या. त्या दोघांना मुलींचे आई -वडील ओळखत असल्याचेही पोलिस चौकशीत स्पष्ट झाले अाहे. पालकांनीच त्या मुलींना मुंबई येथे शिक्षणासाठी नोकरीसाठी त्या व्यक्तीबरोबर जाण्यास सांगितले आहे. यावरून त्या दलालास आई- वडील ओळखत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या त्या मुलींपैकी एका मुलीच्या नातेवाईकांशी लोहमार्ग पोलिसांचा संपर्क झाला आहे. येत्या एक ते दोन दिवसात ते सोलापुरात येणार आहेत. तसेच आरोपीचे स्केच तयार केलेत. आरोपीच्या तपासासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक लवकरच ओडिशाला जाणार आहे. पोलिसांनी ही माहिती गजपती पोलिसांना दिली असून त्यांच्याकडूनही तपास सुरू आहे.

तपासात खरा प्रकार समोर येईल
त्या मुलींना नोकरी शिक्षणासाठी दोघा व्यक्तींसोबत अाई-वडिलांनी सोपविले होते. मुंबईत त्यांना वाममार्गाला लावणार होता की शिक्षण अाणि नोकरी मिळवून देणार होता याची खातरजमा अजून करायची अाहे. अामचे एक पथक तिकडे तपासाला जाणार अाहे. एका व्यक्तीचे नाव समोर अाले आहे. तो मुंबई क्राईम ब्रँचच्या रेकाॅर्डवर अाहे का? याची माहिती मागविली अाहे. मुलींच्या सांगण्यातून काही मुद्दे समोर अाले अाहेत. नेमकी भूमिका काय अाहे दोन दिवसात चौकशीत समोर येईल. आताच कोणत्याही बाजूने निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग विभाग, पुणे
बातम्या आणखी आहेत...