आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ टक्के गावांतील ऑनलाइन यंत्रणा ऑफ, ७/१२ उतारा मिळेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लॅपटॉप दिल्याने भाऊसाहेब (तलाठी) हायटेक झाले असले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा अद्यापही लाभ मिळण्यात अनंत अडचणी येत आहेत. १२ ऑगस्ट २०१४ पासून जिल्ह्यात ऑनलाइन उतारे देण्यास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय भूमी अभिलेख कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन उतारे देता यावेत, यासाठी प्रत्येक तलाठ्यांना लॅपटॉप थ्रीजी कंपनीचे डेटा कार्ड देण्यात आले. परंतु आज जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावांमध्ये नेटवर्कच मिळत नसल्याने सात-बारा मिळविण्यासाठी थेट तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत आहे. या कटकटीला आता तलाठीही वैतागले आहेत. नेटवर्कच मिळत नसल्याने डेटा कार्ड असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
राज्य शासनाने सन २००६ मध्ये जमीनविषयक रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने हाताळता यावे, नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा लाभ घेता यावा, या दृष्टीने राष्ट्रीय भूमी अभिलेख अभियानांतर्गत ऑनलाइन सात-बारा हा उपक्रम हाती घेतला. परंतु जिल्हा प्रशासन अद्यापही ऑनलाइन सात-बारा उपक्रम १०० टक्के यशस्वी करू शकले नाही. जिल्हा प्रशासनास जिल्ह्यातील सात-बारा उतारा फेरफार नोंदी घेण्यास १० वर्षाचा कालावधी लागला. २००८ ते २०१४ या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात डेटा फिडिंगचे काम करण्यात आले. यानंतर प्रत्यक्षात १२ ऑगस्ट २०१४ पासून ऑनलाइन सात-बारा उतारा देण्यास सुरुवात करण्यात आली. आजही उतारे देण्यात अनेक त्रुटी राहिल्याने दुरुस्तीची प्रक्रिया तालुकास्तरावर सुरूच आहे.
आयडिया कंपनीचे डेटा कार्ड दिले आहे, त्यात तलाठ्यांकडे दिलेल्या गावांची संख्या अधिक आहे. शिवाय, गावात फोनची रेंज येत नाही, तिथे डेटा कार्डला कोठून येणार. उताऱ्यासाठी आम्हाला सोलापूरलाच जावे लागते.
लाभापासून सर्वसामान्य वंचितच
जिल्ह्यातील ११४४ महसुली गावांमध्ये ५९१ तलाठी ९५ मंडलाधिकारी यांच्याकडे आज लॅपटॉप थ्रीजी डेटा कार्ड आहे. नागरिकांना ऑनलाइन सात-बारा उतारा सहज सुलभ पद्धतीने देता यावा, यासाठी शासनाने ही व्यवस्था केली आहे. यापैकी आज ३०० पेक्षा अधिक गावांमध्ये, विशेषत: सीमाभागातील गावात नेटवर्क मिळत नसल्याने उतारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर पर्याय म्हणून तलाठ्यांनी तहसीलदारांच्या परवानगीने दोन त्यापेक्षा अधिक गावांसाठी ब्रॉडबॅण्ड कनेक्शन घ्यावे. यामुळ तातडीने उतारेही देता येतील.
२५ रुपये उताऱ्याची फी नियमानुसारशासनाने ऑनलाइन सात-बारा उताऱ्याची फी ठरवून दिली आहे. एका उताऱ्याला तलाठ्यांनी नागरिकांकडून २५ रुपये घ्यायचे आहेत. यामध्ये १५ रुपये तलाठ्यास तर १० रुपये शासनाला जमा करायची आहे. तलाठ्यांनी घेतलेल्या १५ रुपयांतून वीज बिल, प्रिंटर, लॅपटॉप दुरुस्ती स्टेशनरी हा खर्च भागवायचा आहे. परंतु येथील तलाठ्यांकडून अधिक रक्कम आकारली जाते.
नेटवर्क मिळत नाही, ग्रामपंचायतींनी ठराव करून प्रशासनाला देण्याची मागणी
जिल्ह्यातऑनलाइन सात-बारा उतारा देण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु नेटवर्क किती गावांमध्ये मिळेल? याचा विचारच केला नाही. आज अनेक गावांमध्ये थ्रीजीला नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांना उतारे मिळण्यात अडचण येत आहे. याबाबत काही तलाठ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला नेटवर्क मिळत नाही असा ठराव करून जिल्हा प्रशासनाला द्या, अशी विनंतीही केली अाहे. या नेटवर्कच्या गोंधळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे. मागील महिन्यापासून अक्कलकोट तालुक्यातील डेटा कार्डचे बिलच भरले नसल्याने डेटा कार्ड बंदच आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या यंत्रणेचा लाभ मिळत नाही.
शासनाने निर्णय घ्यावा...

अ.रजाकमकानदार, अध्यक्षतलाठी संघटना.
राष्ट्रीय भूमी अभिलेख कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन सात-बारा उतारा ही पद्धती चांगली आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे उतारे मिळण्यात अडचणी येत आहेत. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांतील गावांमध्ये नेटवर्कच येत नाही. यामुळे उतारे घेण्यासाठी नागरिकांना थेट तालुक्याला यावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही कळविले आहे.
आमच्याकडे एकही तक्रार नाही...
रमेशचव्हाण, प्रभारीनिवासी उपजिल्हाधिकारी.
थ्रीजीचे नेटवर्क नसल्याने उतारे मिळत नाहीत, अशी आमच्याकडे एकही तक्रार प्राप्त नाही. संबंधित तहसील कार्यालयाने डेटा कार्डचे वाटप केले आहे. ज्याठिकाणी नेटवर्क नाही, त्याठिकाणी ज्या कंपनीचे नेटवर्क आहे, ते डेटा कार्ड वापरावे. मागणी असेल तर आम्ही ब्रॉडबॅण्डचे कनेक्शन मिळवून देऊ. नेटवर्क नसल्याने कारण सांगून कोणी तलाठी उतारे देत नसतील, तर कारवाई करण्यात येईल.
नेटवर्क नसलेले कार्ड खरेदी केल्याने अडचणीत भर
गावपातळीवरनेटवर्कची अडचण येणार, हे गृहित धरूनच शासनाने संबंधित ज्या कंपनीचे नेटवर्क आहे, तेच डेटा कार्ड घेण्यात यावे, असे शासनाने तहसीलदाांना सूचना दिल्या होत्या. परंतु जिल्ह्यात सरसकट आयडिया कंपनीचे डेटा कार्ड खरेदी करण्यात आले. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अडचणी येत आहेत. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. यामुळे नागरिकांना उतारे मिळण्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
नेटवर्क नाही आणि वीजही नाही...
पांडुरंगसाबळे, उपसरपंचविंचूर.
विंचूर तलाठी कार्यालयात तलाठी येतो पण, उतारे मिळत नाहीत. उताऱ्याची मागणी केली असता. नेटवर्क नाही, मंद्रुप किंवा सोलापूरला या असे सांगितले जाते. तलाठी कार्यालयात वीज कनेक्शनही नाही.
बातम्या आणखी आहेत...