आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख रुपयांची लाच घेताना मुख्‍यध्‍यापिकेला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर – जिह्यातील करजगी (ता. अक्‍कलकोट) येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा पगार काढून देण्‍यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणा-या मुख्‍यध्‍यापिकेला आज (मंगळवार) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. पी. टी. वाघ असे तिचे नाव आहे.
बसवेश्वर शिक्षण संस्थेतील शिक्षकांचे पगार काही दिवसांपासून झाले नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्‍यान, पगार काढून देण्‍यासाठी मुख्‍याध्‍यापिका वाघ यांनी संबंधित शिक्षकांना एकत्रित दोन लाख रुययांची मागणी केली. या बाबत सर्व शिक्षकांनी संघटित होऊन एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने सापळा रचून लाच घेताना मुख्‍याध्‍यापिकेला अटक केली.