आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, वृद्धाला सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या नातीसमान अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरात नेऊन तिच्या तोंडावर चिकटटेप लावून अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६५ वर्षीय वृद्धाला वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. 
 
कळंब तालुक्यातील सोंदणा (ढो) येथे दि. १५ जून २०१५ रोजी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर अंगणात एकटीच गजगे खेळत बसली होती. यावेळी आई कामानिमित्त उस्मानाबादला गेली होती तर आजी घरामध्ये कामात होती.यावेळी आरोपी बाबूराव शंकर उर्फ कोंडिबा क्षीरसागर (६५) याने सदरील मुलीला आवाज देऊन बोलावून घेतले. त्यानंतर तिच्या तोंडाला चिकटटेपने दाबून तिला बळजबरीने घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित मुलीने रडत घरी जाऊन घडला प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एस.ए.आर.औटी यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये १३ साक्षीदार तपासण्यात आले. यातून समोर आलेला पुरावा आणि अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी क्षीरसागर याला वर्षे सक्तमजुरीची शिक्षा १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडातील हजार रुपयांची रक्कम पीडितीला देण्याचे आदेश दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...