आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुनी मिल प्लॉट धारक संघटनेचे धरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुनी मिलची जागा कामगारांना वाटप प्रकरणात मोठा अपहार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत वारंवार पुराव्यासह तक्रारी करूनही चौकशी केली जात नाही. या प्रकरणाची चौकशी करून मुख्य प्रवर्तक कुमार करजगी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जुनी मिल प्लॉटधारक संघटना आम आदमी पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदाेलन केले.
ज्या कार्यालयाशी संबंध आहे, त्यांना वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र संबंधित अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना संपूर्ण पुराव्यासह निवेदनही दिले आहे. याची चौकशी करावी, असा शेराही त्यांनी मारला आहे. उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनाही तक्रारीची प्रत दिली आहे. मात्र सहा महिन्यानंतरही ठोस प्रभावी कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची माहिती अधिकाराखाली सर्व कागदपत्रे मिळविली आहेत. ही कागदपत्रे कारवाई करण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयास तक्रारीसोबत जोडली आहेत.
सहायक धर्मादाय, नगर भूमापन अधिकारी, शहर उपनिबंधक, जिल्हा विशेष शाखा, तहसीलदार उत्तर सोलापूर, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर महानगरपालिका, दस्त नोंदणी कार्यालय, महावितरण यासह युको बँक, बँक ऑफ बडोदा, समर्थ बँक बँक ऑफ हैदराबाद या कार्यालयाचा जुनी मिल प्रकरणाशी संबंध येतो.

आंदोलनात नूतनकुमार गांधी, चंदूभाई देढीया, रत्नकांत निमाले, अनिल लादे, रमेश शाह, खुशाल देढीया, महादेव माने, संजय सेठिया, पारस शहा, संदीप जव्हेरी, राजू शहा, शैलेश उपाध्ये यांच्यासह प्लॉटधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१५ दिवसांत संयुक्त बैठक घेणार...
^जुनीमिल प्लॉटधारक संघटनेने निवेदन दिले. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या प्रकरणामध्ये ज्या ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयाचा संबंध येतो, त्या कार्यालयाचे प्रमुख आणि जुनी मिल प्लॉटधारकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांमध्ये घेण्यात येईल.'' रणजितकुमार,जिल्हाधिकारी

प्रत्यक्षात जमीनच शिल्लक नाही
उमा गृहनिर्माण संस्थेचे प्रवर्तक कुमार करजगी कामगारांना जागा ताब्यात देण्याचे आवाहन करतात, मात्र जागाच उपलब्ध नाही. शिवाय गृहनिर्माण संस्थेचे लेआऊट अनेक वेळा बदलण्यात आले आहे. पूर्वी ज्यांना जागा दाखविली, ती आज एकासही मिळत नाही. वृत्तपत्रातून चुकीचे आवाहन करून दिशाभूल होत असल्याचा आरोप प्लॉटधारकांनी केला.
जुनी मिल प्लॅटधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...