आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांती चौकात ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शांती चौक पाणी टाकीजवळून दुचाकीवरून जाताना मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने बालम्मा कृष्णहरी पुठ्ठा (वय ८२, रा. विडी घरकुल, एच ग्रुुप) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी अडीच्या सुमाराला घडला. 
 
ट्रकचालक लखविंदरसिंग मंगलसिंग (वय ३८, रा. अमृतसर, पंजाब) याला ताब्यात घेण्यात अाले. ट्रक (एचएल ०१, एल ५०२८) शांतीचौकातून अक्कलकोट रस्त्याकडे जात होता. दुचाकीवर (एमएच १३ सीएम ५४२३) पुठ्ठा या पाठीमागे बसल्या होत्या. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावल्याचे सांगण्यात अाले. त्यांचा नातू मेहूल बल्ला यांनी तक्रार दिली अाहे. मेहूल हाही जखमी अाहे. बालम्मा नातवासोबत रेशन कार्ड घेऊन परत जात होत्या. अपघानंतर त्या बाजूला पडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्यामुळे मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. फौजदार दांडगे तपास करीत अाहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक जॅम झाली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...