आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Om Avasthi Get Gold In National Diving Competition

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ओम अवस्थीला सुवर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शालेय राष्ट्रीय जलतण स्पर्धेतील डायव्हिंग प्रकारात येथील डायव्हिंगपटूनी सुवर्ण दोन रौप्य पदके पटकावत सलामी दिली. कोलकता येथे बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सोलापूरचे १४ खेळाडू सहभागी झाले आहेत. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात करजगी ऑर्चिड स्कूलच्या ओम अवस्थीने २३० गुण मिळवत हायबोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्ण पटकावले. उमाबाई श्राविका प्रशालेच्या शिवराज पाटीलने १८६ गुणांसह रौप्य संपादिले. मुलींच्या गटात सेंट जोसेफच्या बिल्वा गिरामला रौप्यवर समाधान मानावे लागले. तिने १७४ गुणांसह यश प्राप्त केले.