आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Next Monday Discussion About 6 Place In Municipal Corporation In Solapur

महापालिकेच्या सभेत जागेचे विषय, सोमवारी होणार आहे चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका स्थायी समितीत जागेचे विषय घेऊन मंजूर करण्यात येत आहेत. त्यात आता महापालिकेच्या सभागृहातही जागेच्या विषयावर नगरसेवकांकडून प्रस्ताव येत आहेत.
ऑगस्टची सर्वसाधारण सभा सोमवारी बोलवण्यात आली आहे. एकूण १५ विषय चर्चेसाठी असून त्यापैकी सहा विषय जागेचे आहेत. दत्त चौकात एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकून राजलक्ष्मी संजय शिंदे या बालिकेचा गुदमरून मृत्यू झाला.त्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन नगर अभियंता सुभाष सावस्कर, उपअभियंता सतीश विठ्ठल जाधव, सुनील लामकाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी मनपा आयुक्तांकडे परवानगी मागितली त्यास मनपाआयुक्तानी मान्यता दिली ही बाब मनपा सभागृहास कळवण्यासाठी सभेपुढे विषय आहे.
अन्सारी चौक ते दत्त मंदिरपर्यंत डांबरीकरण रस्ता करण्यासाठी ३०.६३ लाखांची तरतूद होण्यासाठी विषय आहे. सोलापूर विद्यापीठास डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव नगरसेवक पीरअहमद शेख दीपक राजगे यांनी दिला आहे.
सभे पुढील हेत्र आहेत जागेचे विषय
मुळीक वाचनालय समाज मंदिरच्या जागेवर पत्रा तालिम युवक क्रीडा समाजसेवा मंडळास व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी
मित्रनगर शेळगी ते दहिटणेपर्यंतचा रस्ता २४ मीटरऐवजी १८ मीटर रुंदीचा करणे.
नवी पेठेत जुना जनता शॉपिंग सेंटर समोर महापालिका कर्मचारी वसाहतील जागा तुळजाभवानी क्रीडा सांस्कृतिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था, उत्तर कसबा पत्रा तालिम यांना देऊन वाणिज्य वापरासाठी देणे.
न्यू जगजीवन राम हौसिंग सोसायटी मोदी येथेमोकळ्या जागेत मिनी गाळे बांधणे.
मनपा उर्दू शाळा क्रमांक चार मागेखुल्या जागेत सहा बाय आठचे २९ मिनी गाळे बांधणे.
विडी घरकुल येथील जागेवरील अंतिम ले-आउटमधील सात आरक्षण रद्द करणे.