आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवपूजेला पाणी आणण्यासाठी गेलेला तरुण पुजारी भीमेत बुडाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर- पूजेसाठी भीमा नदीत पाणी आणण्यासाठी गेलेला तरुण पुजारी भीमा नदीत बुडाला. त्याचा शोध लागला नाही. साेमवारी (दि. १८) सकाळी साडेसहाच्या सुुमारास मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथे ही घटना घडली. सायंकाळपर्यंत शोधाशोध करण्यात आली. अशोक तुकाराम पुजारी (वय २३) असे त्याचे नाव आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात घडलेली ही तिसरी दुर्घटना आहे. 

अरळी येथील नृसिंह देवाच्या पूजेचा मान पुजारी कुटुंबाकडे आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्याकडे पूजा आहे. अशोक हा दररोज सकाळी संध्याकाळी नृसिंह देवाच्या पूजेसाठी भीमा नदीच्या पत्रातून पाणी आणायचा. साेमवारी सकाळी सातपूर्वी तो पाणी आणायला गेला. मात्र, पाय घसरून खड्ड्यात पडल्याने तो बुडाला. तो पाणी घेऊन आल्याने काहीनी नदीकडे धाव घेत शोध घेतला असता खड्ड्यावर त्याचा टाॅवेल, घागर मिळाली. शोध घेण्यासाठी गावातील तरुण नदीपात्रात उतरले. मंगळवेढा पोलिसांना घटनेची माहिती दिली. नावाडी पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. परंतु सायंकाळपर्यंत तो सापडला नाही. ग्रामस्थ पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मंडल अधिकारी जितेंद्र मोरे, प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे, पोलिस उपनिरीक्षक शाहूराजे दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू होते. कर्नाटक पोलिसांनाही याची माहिती दिल्याचे सांगण्यात आले. 

वाळूउपशामुळे पडलेल्या खड्ड्याने घेतला बळी
अशोक पुजारी हा पाय घसरून खड्ड्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाला. वाळू उपशामुळे हा खड्डा पडला आहे. तो साधारण ३० ते ४० फूट खोल आहे. जिल्ह्यात वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात बुडून अनेकांचा जीव गेला आहे. 
बातम्या आणखी आहेत...