आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: सांगोला तालुक्यात वीज पडून एक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - तालुक्यातील खवासपूर येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला. पाऊस पडत असताना हरिदास अप्पासाहेब भोसले (वय ५६) हे आपल्या शेतातील कडब्याची गंजी झाकण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते भाजून जागीच ठार झाले.

जिल्ह्यात अवकाळी
सांगोला,मंगळवेढा आणि बार्शी शहरांसह तालुक्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.