आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या संग्रहालयात दीड लाख वर्षापूर्वीचे अवशेष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-कुलगुरूडॉ. एन. एन. मालदार डेक्कन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे २७ जुलै रोजी दोन्ही विद्यापीठांतील प्राचीन भारतीय इतिहास पुरातत्त्व विभागामध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे इसपूर्वीचे दीड लाख वर्षापूर्वीचे अवशेष सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रलयात दाखल झाले आहेत. पुरातन अवशेष उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, प्राध्यापकांना अभ्यासासाठी फायदा होणार आहे.
सोलापूर विद्यापीठात पुरातत्त्व विभागाचे २००८ मध्ये वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले. तेव्हापासून संग्रहालयात प्रागैतिहास, इतिहासपूर्व, सिंधू संस्कृती, सातवाहन कालखंड आदी कालखंडातील अवशेष ठेवण्यात आलेले आहेत. पुरातत्त्व विभागाने मुडवी मंगळवेढा, वाकाव माढा, शिवूर नांदेड, दक्षिण सोलापुरातील कारकल याठिकाणी केलेल्या उत्खननाद्वारे सापडलेल्या अवशेषांचाही समावेश संग्रहालयात केला आहे. एकंदरीत संग्रहालयात अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष अभ्यासासाठी ठेवले आहेत. परंतु सामंजस्य करारामुळे इ.स.पूर्व दीड लाख ते इ.स.पूर्व ५० हजार वर्षापूर्वीचे हात कुऱ्हाड, सूक्ष्म हत्यारे, तासणी, घासणी आदी अवशेष ठेवल्यामुळे वस्तू संग्रहालयाच्या वैभवात भर पडली आहे.

सोलापूर विद्यापीठ डेक्कन विद्यापीठामध्ये झालेला करार कौतुकास्पद आहे. सोलापूर विद्यापीठ पुरातत्त्व विभागातील वस्तुसंग्रहालयात इ.स.पूर्व दीड लाख ते इसपूर्व ५० हजार वर्षांचे अवशेष ठेवण्यात आले आहे. या अवशेषाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. प्रा.प्रभाकर कोळेकर, पुरातत्त्व विभाग

सामंजस्य कराराचे असे आहेत फायदे
विद्यार्थी,प्राध्यापक अभ्यासासाठी अदलाबदल करता येणार
प्रशिक्षण, कार्यशाळा,परिसंवाद आयोजन करता येणार
संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण, उत्खनन करता येणार
पुरावशेष एकमेकांना अभ्यासासाठी देता येणार
पीएच.डी., एमफील, पदव्युत्तर िशक्षणासाठी प्रयोगशाळा गं्रथालय, मार्गदर्शन वर्ग

या आहेत पुरातत्त्व वस्तू
पुराश्मयुगीनकालखंडातील हातकुऱ्हाड-४, तासणी-१, घासणी-१, मध्य पुराश्मयुगीन हत्यारे-८, उत्तर पुराश्मयुगातील ब्लेड-१, मध्याश्मयुगीन सूक्ष्म हत्यारे-८, नवाश्मयुगीन हात कुऱ्हाडी-२, छोट्या कुऱ्हाडी-४, सिंधू संस्कृती कालखंडातील कुंथाशी येथील विविध भांड्याच्या तुकड्यांचे अवशेष-२६, ताम्र पाषाण युगीन कालखंडातील भग्न झालेल्या भांड्यांचे अवशेष-८, गोफन गुंडा-१, ताम्र पाषाण युगातील प्राण्याची हाडे-५, छोटे पाटे-२, महापाषाण युगीन काळातील अभ्रकाच्या भांड्याचे आवशेष-१ आदी वस्तूंचा सोलापूर विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयात समावेश करण्यात आला आहे.

संग्रहालयात दाखल झालेल्या पुरातन वस्तू.
पुरातत्त्व विभागाकडून पूर्वीपासून उत्खननाचे काम चालू आहे. या संशोधनाला डेक्कन येथील राष्ट्रीय पातळीवरील संशोधन केंद्रांचा उपयोग होण्यासाठी करार केला आहे. यामुळे संशोधनाला चालना मिळेल. दोन्ही विद्यापीठे विविध उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. डॉ.एन.एन. मालदार, कुलगुरु
बातम्या आणखी आहेत...