आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लहानपणी वडिलांचे छत्र हरपले. काही महिन्यांपूर्वी आई गेली. त्यामुळे काही दिवस बहिणीकडे आणि काही दिवस मामाकडे राहत होता. शुक्रवारीच तो मामाकडून बहिणीकडे अाला. शनिवारी सकाळी भाजी अाणतो म्हणून मार्केट यार्डात अाला. परतताना तोल जाऊन कंटेनरच्या मागील चाकात पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही अाठवण सांगून बहीण आक्रोश करत होती. कल्लप्पा विठोबा पगडे (वय ३०, रा. केकडेनगर, मुळेगावरस्ता) असे मृताचे नाव अाहे. हा अपघात सकाळी साडेदहाच्या सुमाराला घडला. शासकीय रूग्णालयात बहिण काका आले. कल्लपाचा मृतदेह पाहून दोघांनी टाहो फोडला. परमेश्वर पगडे (रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड) यांनी जोडभावी पोलिसात तक्रार िदली अाहे. ट्रकचालक (एएचअार ५५ वाय ५८१७) उत्तम मुधळे (रा. डिग्रस, कंदर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात अाले अाहे. 

ट्रक हैदाराबादच्या दिशेने जात होता. चौकात अाल्यानंतर हा प्रकार घडला. डोक्यावरून चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात अाणला. िखशातील डायरीवरून नातेवाईकांचा शोध घेतला. कल्लप्पा हा अविवाहीत होता. हाताने थोडा अंपग असल्यामुळे कुठे कामाला जात नव्हता. मार्केट यार्डातील अपघात रोखण्यासाठी सिग्नल लावण्यात अाले. पण तीन महिन्यांपासून सिग्नल बंदच अाहे. 
बातम्या आणखी आहेत...