आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांसाठी दोन रुपयांत एक लिटर शुद्ध पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्ण रुग्णांच्या नातेवाइकांकडून पाण्याचा अपव्यय मिनरल वॉटरवरील खर्च वाचविण्यासाठी दवाखान्यात वॉटर व्हेंडिंग मशीन बसविली आहे. या मशीनमध्ये दोन रुपयांचे क्वाईन टाकल्यास एक लिटर मिनरल पाणी मिळते. हा उपक्रम महिनाभरापासून सुरू करण्यात आला आहे.

वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्याच्या आगोदर दवाखान्यात साधे फिल्टर कुलर बसविण्यात आले होते. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनलिमिटेड पाण्याचा वापर केला जाता होता. पाण्याची नासाडी होत होती. काही रुग्णांचे नातेवाईक खासगी दुकानातून मिनरल पाण्याच्या बाटल्या खरेदी करत. त्या बाटल्यांचा कचरा रुग्णालयात साचत होता. कचऱ्यांची विल्हेवाट लावणे मुश्कील होत होते. त्यावर हॉस्पिटलने शक्कल लढवत वॉटर व्हेंडिंग मशीन बसविण्याचे ठरविले. अॅरो मशीन वॉटर व्हेंडिंग मशीन बसविल्यामुळे रुग्णांना स्वच्छ, थंड पाणी मिळत आहे. शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्ती मिळाली आहे.
शहाळ्याचा वापर
हॉस्पिटलमध्येशहाळे मोठ्या प्रमाणात साचत होते. शहाळे वाळवून ते पाणी तापविण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे कचरा कमी झाला आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत होती. व्हेंडिंग मशीन बसविल्यामुळे पाण्याची नासाडी रुग्णाच्या नातेवाईकांचे पैसे वाचत आहेत. डॉ.अजित गांधी, युनिक हॉस्पिटल
बातम्या आणखी आहेत...