आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेने खोकडाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्ता आेलांडणाऱ्या खोकड प्राण्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे सकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नान्नज अभयारण्याच्या परीक्षेत्रात खोकड प्राण्यांचा अधिवास अाहे. कोल्ह्यापेक्षा कमी उंचीचा हा प्राणी शेतातील उंदीर घुशी प्रामुख्याने खातो. शेजारील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरात त्याचा अधिवास आहे.

आठ वर्षांपूर्वी वन्यजीव अभ्यासक डॉ. अभीतमीम वनक यांनी नान्नज अभयारण्यात खोकड प्राण्यावर संशोधन केले होते. त्यावेळी दुर्मिळ होत असलेल्या या प्राण्याचे संरक्षण संवर्धनाची गरज असल्याचे निष्कर्ष त्यांनी नोंदवले होते. जिल्हा परिषद शिक्षक विष्णू घोडके यांनी जखमी खोकडास उपचारास नेण्याचा प्रयत्न केला. पण, अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्याचे प्राण वाचणे शक्य नव्हते, असे निसर्गप्रेमी आदित्य क्षीरसागर, सारंग म्हमाणे यांनी सांगितले. वन्यजीव कर्मचारी श्री. कुर्ले हे घटनास्थळी तातडीने पोहोचले होते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून त्यावर अंत्यसंस्कार केले.
बातम्या आणखी आहेत...