आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा चोरी : 800 पिशव्या, पोते जप्त; सोमवारपासून महिलांसह 50 सुरक्षा रक्षकांची नेमणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर बाजार पेठेत कांदा चोरीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आल्याने बाजार समिती प्रशासक कुंदन भोळे प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी गुरुवारी कांदा सेल हॉलमध्ये तपासणी करीत ८०० रिकाम्या पिशव्या पोते जप्त करून संबंधितांना समज दिली. 


बुधवारीच व्यापाऱ्यांनी कांदा चोरीचे कारण पुढे दाखवत शेतकऱ्यांना वेठीस धरत कांदा लिलाव बंद पाडले हाेते. याची दखल घेत प्रशासक भोळे यांनी कर्मचाऱ्यांना घेत गुरुवारी सकाळी साडेआठ ते दुपारी १२ यावेळेत संपूर्ण कांदा सेल हॉलमध्ये तपासणी करीत जवळपास ८०० पिशव्या जप्त केल्या. तसेच यावर नियंत्रण आणण्यासाठी बाजार समितीने एक नवा निर्णय घेतला असून सोमवारपासून बाजार समितीत नव्याने ५० सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात १० महिला सुरक्षा रक्षक असणार आहेत. 


तारणकर्ज योजना सुरू 
शेतकरीतारण कर्ज योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, प्रशासक भोळे, सचिव पाटील, आडत व्यापारी संघाचे आवजे, रियाज बागवान यांच्यासह व्यापारी शेतकरी उपस्थित होते. 


बाहेरचा चोर नाहीच 
बाजारसमितीत बाहेरचा चोर येऊन चोरी करण्याचे प्रमाण तसे कमीच आहे. माथाडी स्त्री कामगारांना म्हणावी तशी मजुरी मिळत नसल्याने मदतनीस महिला कामगार घेतले जातात. त्यांना मजुरीच्या बदल्यात कांदा दिला जातो. आता कामगारांना परवाना देत, आता ओळखपत्रेही देण्यात येणार आहे. त्यामुळे चाेरीला आळा बसेल. 


सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री सिद्धेश्वर बाजार पेठेच्या कांदा सेल हॉल परिसरात प्रशासक भोळे, सचिव विनोद पाटील यांनी तपासणी करीत कांदा चोरीत वापरण्यात येणाऱ्या ८०० रिकाम्या पिशव्या जप्त केल्या. 

बातम्या आणखी आहेत...