सोलापूर- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कच्च्या पक्क्या वाहन परवान्यासाठी कोटा मर्यादा वाढवली आहे. कच्च्या परवान्यासाठी १२०वरून १६० तर पक्का परवान्याचा कोटा ९० वरून ११० करण्यात आला.
सध्याऑनलाइन अपॉइंटमेंट टेस्ट सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असते. याच्या वेळेत सोमवारपासून वाढ होणार आहे. वेटिंगचा कोटा कमी होण्यासाठी सकाळी ते या वेळेतदेखील चाचणी परीक्षा सुरू असणार आहे. तसेच आरटीओ प्रशासन यासाठी आवश्यक असणारे २० संगणक संच घेणार आहेत. त्यामुळे बॅचच्या वेळेत बॅचमधील उमेदवारांच्या संख्येतदेखील वाढ होणार आहे.
तीन महिन्यापर्यंत असलेले वेटिंग एक महिन्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. येत्या सोमवारपासून अॅपाइंटमेंट एंगेस्ट कॅन्सलेशन ही पध्दत लागू करण्यात येईल. उमेदवाराची दोन वाजेपर्यंत वाट बघितली जाईल. त्यानंतर ज्यांची अपाॅइंटमेंट अन्य दिवशी असेल त्यांना परीक्षेस बसू देण्यात येईल. मात्र यासाठी त्या दिवशी किती वाहनधारकांनी परीक्षा दिली, किती जणांनी दांडी मारली हे पाहून ठरविण्यात येईल.
अपॉइंटमेंट घेतलेल्यांपैकी रोज सुमारे ४० टक्के उमेदवार परीक्षेस दांडी मारतात. येणे शक्य नसल्यास आदल्या दिवशी अपॉइंटमेंट रद्द करावी जेणेकरून त्या दिवशी दुसऱ्या उमेदवारास अपॉइंटमेंट मिळेल. वेटिंगचा आकडा सध्या तीन महिन्याचा आहे. हा आकडा कमी करण्यासाठी आता रविवारी आरटीओ कार्यालय सुरू राहणार आहे. रविवारी फक्त वाहन परवान्याची कामे केली जातील. अन्य कामे मात्र होणार नाहीत.
अपॉइंटमेंटसाठी सध्या तीन महिन्यांचे वेटिंग आहे. ते कमी व्हावे म्हणून विविध उपाय आखण्यात येत आहे. यात अपॉइंटमेंटचा कोटा वाढविण्यात आला आहे.तसेच रविवारी देखील आरटीओ कार्यालय सुरू राहणार आहे.'' बजरंगखरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर