आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांत केवळ १०० ऑनलाइन तक्रारी, पोलिस आयुक्तालयाच्या सेवेकडे नागरिकांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरिकांच्या सुविधेसाठी हायटेक यंत्रणेच्या सहाय्याने सोलापूर आयुक्तालयाच्या वतीने २०१४ मध्ये ऑनलाइन तक्रारी नोंदणीची सेवा सुरू करण्यात आली. मात्र, नागरिकांचे या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याला केवळ १५ ते २० तक्रारी करतात. यातही शुल्लक तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या या सुविधेकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही लोकांना या पोलिसांच्या या सेवेविषयीच माहिती नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
यंदाच्या वर्षाच्या जानेवारी ते जून या कालावधी केवळ १०० तक्रारीची नोंद झालेली आहे. यातही फेसबुकचे अकाऊंट हॅक केले, शेतातील झाड तोेडले, अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. तक्रारीची आकडेवारी पाहता पोलिसांनी सुरू केलेल्या या सेवेकडे नागरिकांची उदासीन भूमिका दिसून येत आहे. तसेच, ज्या हेतूने ही सेवा सुरू करण्यात आली त्याचा लाभ नागरिक घेताना दिसत नाही.

सुविधेचा लाभ घ्या
^पोलिसठाण्यात जाताही महिलांना ऑनलाइन तक्रारी करण्याची सोय या सेवेअंतर्गत उपलब्ध करण्यात आली आहे. महिलांच्या दृष्टीने ही सुविधा सुरक्षेची आहे. या सुविधेव्दारे एखादी घटना बाहेरगावी घडली असेल तर त्याला त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देता येते. शिवाय, प्रकरणाचा छडा लवकर लावणे शक्य होते. नागरिकांनी याचा उपयोग चांगल्या पध्दतीने करून घ्यावा. शर्मिष्ठा वालावलकर, सहायकपोलिस आयुक्त

महिलांची तक्रार नोंदवण्यात उदासीनता
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या या सेवेची अंमलबजावणी सोलापुरात २०१४ पासून सुरू झाली. पोलिस स्टेशनला जाताही तक्रार करण्याची सोय या पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे उपलब्ध केली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या सेवेचा उपयोग महिलांना मोठ्या प्रमाणात होईल, असे अपेक्षित होते. त्याच हेतूने ही योजना सुरू केली. मात्र, त्याचा मूळ उद्देश बाजूला राहून केवळ नाममात्र तक्रारी दाखल होत आहेत. सोलापुरात तर केवळ तीन महिलांनी ऑन लाइन तक्रार नोंदवली आहे.

अशी नोंदवा तक्रार
पोलिस आयुक्तालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइनचे ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यावर आपली तक्रार सविस्तर नोंदवता येते. त्यानंतर संबंधातील विभागाकडे तक्रार पाठविली जाते. त्यानंतर ऑनलाइन तक्रारीवर काम करणारी टीम याकरिता पाठपुरावा करते. त्यानुसार फिर्यादीकडून माहिती घेऊन पुढे कारवाई केली जाते. या बाबत पोलिस आयुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त हे दोघेही कटाक्षाने लक्ष देतात.
बातम्या आणखी आहेत...