आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादहून अाॅनलाइनद्वारे लॅपटॉप चोरीची तक्रार, सोलापूर बसस्थानकावर घडली होती घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील बसस्थानकावरून हैदराबादकडे जाणाऱ्या बसमधून एका महिलेजवळील लॅपटाप असलेली बॅग चोरट्याने हातोहात पळवली. बस काही अंतरावर गेल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात अाला. हैदराबादला गेल्यानंतर महिलेने अाॅनलाइनद्वारे फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली. हा प्रकार जानेवारी रोजी घडला होता. मंजूषा श्रीराम माडीवाले (रा. अागखाना अकादमी, माहेश्वर मंडलम हार्डवेअर पार्क, हैदराबाद) यांनी तक्रार दिली अाहे. त्या पंढरपुरातून सोलापूर स्थानकावर अाल्या. हैदराबादला जाण्यासाठी बसमध्ये चढल्यानंतर एका सहप्रवाशाने त्यांची बॅग रॅकमध्ये ठेवतो म्हणून उचलून ठेवली. त्यावर लहान लॅपटाॅपची बॅग ठेवली. काही वेळेत बस सुटल्यानंतर लॅपटाॅपची बॅग जागेवर नव्हती. हैदराबादला गेल्यानंतर अाॅनलाइन तक्रार दिली अाहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार तोळणुरे करीत अाहेत. 

गवळीवस्ती, लक्ष्मी पेठेत मोबाइल चोरीला 
गवळीवस्ती लक्ष्मी पेठेत राहणारे रवी बचुटे यांच्या घरातून पाच हजार किमतीचा मोबाइल चोरांनी पळवला. ही घटना ३० डिसेंबर रोजी घडली असून सोमवारी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. बचुटे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. घरातील हाॅलमध्ये कुणी नसल्याची संधी साधून मोबाइल पळवला.
 
रिक्षा-दुचाकीचीधडक चालकावर गुन्हा दाखल 
सिव्हिलचौकात रिक्षा दुचाकीचा अपघात झाला. स्वप्निल धम्मघोष (रा. सदर बझार) यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली अाहे. रिक्षाचालक (एमएच १३ एएफ १९६०) म. इसाक अहमद हुसेन कुमठे याच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. रिक्षातील काही प्रवासी जखमी झाले अाहेत. 

शिवाजीचौकात बेशिस्त रिक्षा 
शिवाजीचौकात वाहतूक अडथळा करून रिक्षा रस्त्यावर थांबतात. अन्य वाहनांना ये-जा करण्यास अडचण भासत आहे. समोरच पाच सहा पोलिस थांबून दंडात्मक कारवाईत मश्गुल असतात.