आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रासह देशभरातील छोट्या दुकानदारांचा पेटीएमसारख्या अॅप वापरण्याचा प्रयत्न; मागणीत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारातील उलाढाल मंदावली असली तरी देशातील छोट्यातील छोटे दुकानदार ‘पेटीएम’च्या सारख्या अॅप्सच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या २५ दिवसांत लाखांहून अधिक विक्रेत्यांनी ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्याचा चांगला पर्याय असलेल्या ‘पेटीएम’कडून माेफत ‘क्यू आर कोड’ घेतले आहेत. यामध्ये रिक्षाचालक, चहावाला, पानटपरी, वडेवाले, लाँड्रीवाले, फळविक्रेते, मटणविक्रेता यांच्यासारख्या छोट्या व्यावसायिक अधिक आहेत. .
नोटबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. कॅशलेस व्यवहारासाठी ग्राहक व्यावसायिक इंटरनेट बँकिंगसह डेबिट, क्रेडिट, वॉलेट अॅप्सचा वापर करतात. नोटबंदीनंतर ‘पेटीएम’ने छोट्या दुकानदारांना ‘ई वॉलेट’शी उर्वरितपान
जोडण्याचाप्रयत्न सुरू केला आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. यासंदर्भात पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपनन) दीपक अॅबोट म्हणाले की, नोटबंदीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीही पेटीएमचे काम सुरू होते. व्यावसायिकांना पेटीएमशी जोडण्यात आम्हाला परिश्रम घ्यावे लागायचे. नोटबंदीच्या निर्णयानंतर छोट्या व्यावसायिकांना कॅशलेस व्यवहार करण्यात अडचणी आहेत. त्यांच्या मदतीला पेटीएम अॅप धावून आले. नोटबंदीचा निर्णय होण्यापूर्वी गेल्या आठ महिन्यात आम्ही देशात ८.५ लाख व्यावसायिकांसाठी क्यूआर कोड दिले होते, मात्र नोटबंदीनंतर २५ दिवसात लाखांहून अधिक क्यूआर कोड देण्यात आले. लोक स्वत:हून पेटीएम प्रतिनिधींना फोन करीत आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरात पेटीएमचे ७०० हून अधिक प्रतिनिधी यासाठी काम करीत आहेत.

खेड्यांतून मागणी
^पेटीएमने गेल्या २५ दिवसांत लाखांहून अधिक व्यावसायिकांना क्यूआर कोड दिले आहेत. यात ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातील लोकही कॅशलेस व्यवहारासाठी तयार आहेत हे यावरून दिसते. नोटबंदीपूर्वी पेटीएमच्या गेटवे वरून देशात दररोज २२ ते २४ लाखांचे व्यवहार व्हायचे. नोटबंदीनंतर दररोज ५५ ते ५९ लाख रुपयांचे व्यवहार हाेेत आहेत. दीपकअबोट, वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन), पेटीएम.

सात रस्ता येथील वडेवालाही पेटीएम क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे स्वीकारत आहे.
दुकानदारांना ई-वॉलेट सोयीचे : व्यावसायिकांनाकॅशलेस व्यवहारासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाइप मशीन घ्यावे लागते. ही मशीन देणाऱ्या बँकांमध्ये प्रथम १० हजार रुपये भरून चालू खाते काढावे लागते. त्यानंतर ही स्वाइप मशीन मिळते. या मशीनवर महिनाभरात कमीत कमी १५ हजार रुपयांचे व्यवहार व्हायला हवेत. १५ हजारपेक्षा कमी व्यवहार झाल्यास या मशीनचे प्रतिमहिना ५०० ते ७५० रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. याउलट पेटीएमसारखे अॅप मोफत डाऊनलोड करता येते. शिवाय व्यावसायिकांना क्यूआर कोड मोफत दिले जातात. केवायसीनंतर व्यावसायिकांना लाखापेक्षा अधिकचे व्यवहार करता येतात.

बातम्या आणखी आहेत...