आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविम्यासाठी उस्‍मानाबाद जिल्ह्यातून 1703 ऑफलाइन अर्ज, 1 दिवसाची होती मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- खरीप हंगामातील पिकविमा भरण्यासाठी वाढवून देण्यात आलेल्या एका दिवसाच्या मुदतीमध्ये जिल्ह्यातून केवळ १७०३ ऑफलाइन अर्ज स्वीकरण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या पुढील निर्णयावर या अर्जांचे भवितव्य ठरणार आहे. तोपर्यंत हे शेतकरी अधांतरीच राहणार आहेत.
 
पंतप्रधान कृषीपिक विमा योजनेचा खरिपाचा हप्ता भरण्यासाठी यावेळी अत्यंत जाचक अटी लागू करण्यात आल्या. आॅनलाइन प्रणालीच सदोष असल्यामुळे मुळात अर्ज स्वीकारण्यासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी मिळाला होता. सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तीन लाख ७० हजार अर्ज भरून घेतले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेने ३१ हजार तर महा सेवा केंद्रांमध्येही ३२ हजार अर्ज भरून घेण्यात आले होते. तरीही शेतकऱ्यांकडून हप्ता भरण्याची मागणी करण्यात येत होती. यामुळे शनिवारी (दि. ५) केवळ एक दिवस मुदत वाढवण्यात आली होती.

मात्र, ही मुदतवाढही नियमांच्या कचाट्यात होती. तरीही जिल्ह्यातील १७०३ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. सेवा केंद्रचालकांनी सर्व अर्ज कृषी विभागात जमा केले आहेत. आता या अर्जांची छाननी होणार आहे. ३१ जुलैच्या अगोदरचा पिकपेरा नसेल तर तसेच कर्जदार शेतकरी असेल तर त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात येणार आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...