आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवकल्याणच्या ब्रेनडेड तरुणाचे अवयवदान, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रथमच शस्त्रक्रिया यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेनडेड ओंकारची आई रेणुका, वडील अशोक बहीण प्रियंका यांना ओंकारचे पार्थिव पाहिल्यांनतर दु:खाचा आवेग आवरता आला नाही. - Divya Marathi
ब्रेनडेड ओंकारची आई रेणुका, वडील अशोक बहीण प्रियंका यांना ओंकारचे पार्थिव पाहिल्यांनतर दु:खाचा आवेग आवरता आला नाही.
सोलापूर - ब्रेनडेड झालेल्या कर्नाटकातील तरुणाचे सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. १४) यशस्वी अवयवदान करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली. या तरुणाच्या अवयवदानामुळे पुण्यातील चार रुग्णांना जीवनदान मिळाले. ब्रेनडेड व्यक्तींचे अवयव काढून पुण्यात त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची ही गेल्या सहा महिन्यांतील दुसरी घटना आहे. 
 
बसवकल्याण (जि. बीदर, कर्नाटक) येथील ओंकार महेंद्रकर (वय २१) हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १२ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास दाखल केले होते. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर आेंकारच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे यकृत हृदय एअर अॅम्ब्युलन्सने पुण्याला पाठवण्यात आले. दोन्ही किडनी अॅम्ब्युलन्सद्वारे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याला पाठवण्यात आल्या. ओंकारच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले. अवयवदानाची प्रक्रिया झाल्यानंतर दुपारी २.४६ वाजता ओंकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सायंकाळी ४.५० वाजता शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करून ओंकारचे पार्थिव बसवकल्याणला पाठवण्यात आले. पुण्याहून आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकात डॉ. आशिष खनोजी, डॉ. रेड्डी, डॉ. कमलेश बोकील अादींचा समावेश होता. सिव्हिलमधील डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. सचिन पांढरे, डॉ. संदीप होळकर, डॉ. अनघा वरुडकर, डाॅ. ऋत्विक जयकर, डॉ. रवी कांबळे, डाॅ. सचिन जाधव, डॉ. प्रदीप कसबे, डॉ. एस. सरवदे, डॉ. निलांबरी आडके यांच्यासह उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन जत्ती, डॉ. राजेश चौगुले समन्वयक प्रिया पवार, महेंद्र साळवी आदींचा समावेश होता. 
 
पुण्याहून आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकात डॉ. आशिष खनोजी, डॉ. रेड्डी, डॉ. कमलेश बोकील अादींचा समावेश होता. सिव्हिलमधील डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. सचिन पांढरे, डॉ. संदीप होळकर, डॉ. अनघा वरुडकर, डाॅ. ऋत्विक जयकर, डॉ. रवी कांबळे, डाॅ. सचिन जाधव, डॉ. प्रदीप कसबे, डॉ. एस. सरवदे, डॉ. निलांबरी आडके यांच्यासह उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन जत्ती, डॉ. राजेश चौगुले समन्वयक प्रिया पवार, महेंद्र साळवी आदींचा समावेश होता. 
 
सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस 
सोलापुरातीलशासकीयवैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटलच्या दृष्टीने गुरुवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. अवयवदानाच्या चळवळीला गती येत असून आणखी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ओंकारचे चार अवयव पुण्याला नेण्यात आले. दोन डोळे सिव्हिलमध्येच गरजूंना दिले जातील. 
- डाॅ.सुनील घाटे, अधिष्ठाता, सिव्हिल हॉस्पिटल. 
बातम्या आणखी आहेत...