आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात रुजतेय देहदान चळवळ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात देहदान चळवळ चांगलीच रुजत आहे. अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. माधवी रायते यांनी दोन वर्षात सोलापुरात ३५ पेक्षा जास्त देहदान प्राप्त झाले, यापैकी २० देहदान अश्विनी रुग्णालयाला मिळाले, अशी माहिती दिली. सोलापुरात महिन्याला एक किंवा दोन देहदान होतात. मुंबई काही प्रमाणात औरंगाबाद वगळता इतर शहरात देहदान चळवळ इतकी रुजलेली नाही. सोलापुरात वर्षाला १५ ते १६ देहदान मिळतात. देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्थेतर्फे गत सहा वर्षापासून देहदान चळवळ रुजण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काही मोजके ज्येष्ठ नागरिक तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते यांच्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक बनत आहे, देहदानाबरोबर अवयवदान चळवळही अधिक व्यापक झाली पाहिजे, त्यासाठीही संघटना प्रयत्नीशील असल्याचे मत संस्थापक ना.वा. दुमालदार यांनी व्यक्त केले. संस्थेचे मार्गदर्शक विलासभाई शहा, सक्रिय कार्यकर्ते चंदू देढिया, चंद्रकांत कोडगीरवार, श्रीवल्लभ करकमकर, डॉ. अरुण बुरटे, डॉ. प्रकाश मतकर, उदय आळंदकर, योगीन गुर्जर, श्रीकांत निकते यांच्यामुळे ही चळवळ सोलापुरात रुजली आहेच, त्याचबरोबर संस्थेचे कार्यकर्ते राज्यातील औरंगाबाद, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पंढरपूरसह महत्त्वाच्या शहरांमध्येही प्रसाराचे कार्य करीत आहेत. पंढरपुरात तर दधिची नेत्रदान मंडळही या संस्थेच्या प्रेरणेतून सक्रिय झाले आहे.
देहदान चळवळीतून प्राप्त देहांची अभ्यासासाठी उपयुक्तता असते. वैद्यकीय महाविद्यालयांना नेहमीच देहदानाची प्रतीक्षा असते, मात्र सोलापुरात ही चळवळ चांगली रुजल्यामुळे देहदान मिळते. अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १२५ जणांनी देहदानाचे संमती अर्ज भरले आहेत. रत्नागिरीजवळ नव्याने वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झाली , त्यावेळी या महाविद्यालयाकडे अभ्यासासाठी देहदानाबाबत प्रतीक्षा होती. मात्र, सोलापुरातील अश्विनी मेडिकल महविद्यालयाकडे असणाऱ्या अतिरिक्त देह नव्या महाविद्यालयाला देऊन मदत करण्यात आली. केवळ सोलापुरात देहदान चळवळ रुजल्यानेच हे शक्य होते, असे मत अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. माधवी रायते यांनी व्यक्त केले.
अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाकडून देहदानाबाबतच्या प्रसंगी अॅब्ल्युलन्स सेवाही दिली जाते. देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था वैद्यकीय महाविद्यालये यांच्यात त्रैमासिक बैठक होते. यातून देहदान चळवळीला प्रोत्साहन मिळण्यासाठी चर्चा करण्यात येते.
अवयवदानाबाबतही जागृती साधण्याचे कार्य होत आहे. चाटला टेक्सटाईल, विजापूर रोड येथील श्रीराम मेडिकल यांच्याकडूनही देहदान अवयवदान चळवळीचा प्रसार व्हावा म्हणून प्रचार साहित्य देहांगदान संस्थेला देण्यात आले. यातून प्रसार प्रचार सोलापुरात रुजत असल्याची माहिती श्री. दुमालदार यांनी दिली.
देहदानाबाबत जागृतीसाधताना अनेक ठिकाणी अवहेलना होते. १०० संकल्प फार्म भरल्यानंतर तीन टक्के लोक प्रत्यक्ष देहदान करतात. ही संख्या वाढली पाहिजे. ना. वा. दुमालदार, संस्थापक,देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था
सोलापुरात किडणी,यकृत ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र त्यामानाने या अवयवांचे दान करण्यासाठी ब्रेनडेड दात्यांची गरज असते. डॉ. माधवी रायते, डीन,अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...