आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओवेसी समाजात तेढ निर्माण करत आहेत, जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- भारतीयजनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष नाही. पक्षात घराणेशाही नाही. भाजप सर्वांना जोडण्याचे काम करत आहे. तर एमआयएम पक्ष आणि त्या पक्षाचे ओवेसी बंधू समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दकी यांनी व्यक्त केले.

समाजकल्याण केंद्र येथे भाजप अल्पसंख्याक सेलचा मेळावा मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार अॅड. शरद बनसोडे, जाकीरहुसेन डोका, नगरसेवक नागेश वल्याळ, इम्रान मुजावर, नौशाद शेख, डाॅ. रफीक सय्यद, अॅड. रजाक शेख आदी उपस्थित होते.

भाजप हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. महिला, युवक, उद्योगपती, शेतकरी यांच्यासाठी नवीन योजना पक्ष आणत आहे. अल्पसंख्याक समाजासाठी भाजपने योजना आणल्या आहेत. त्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. त्याचा फायदा घ्यावा, असेही सिद्दीकी म्हणाले.
काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकाच्या मनात भीती निर्माण केली. मुस्लिम समाजास निरक्षर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, असे खा. अॅड. शरद बनसोडे म्हणाले. यावेळी शहर भाजप अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी मनोगत व्यक्त केले.