आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी होम मैदान नाकारल्याने ओवेसींची सभा लोकमान्य नगरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाचे अध्यक्ष, खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या मे रोजी सोलापुरात होणाऱ्या सभेच्या स्थळासाठी जणू खो खो सुरू अाहे. शांतता सुवव्यस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी होम मैदानावर परवानगी नाकारली. पर्यायी नई जिंदगी चौकातही पोलिसांनी परवानगी दिली नाही. अखेर लोकमान्य नगर येथे परवानगी देण्यात आली. शनिवारी सायंकाळी वाजता सभा होईल, असे पक्षाने स्पष्ट केले. सभा होम मैदानावर ठरली होती. तशी परवानगी महापालिकेनेही दिली होती. त्यानुसार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्याकडून होम मैदानावर तयारी सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी पोलिस आयुक्तालयाने होम मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. पक्षाने सूचवलेल्या पर्यायी नई जिंदगी चौकासही पोलिसांनी नकार दिला. बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी सांयकाळपर्यंत सभा कोठे घ्यावी यासाठी संयोजकांना धावपळ करावी लागली. अनेक मैदाने फिरून ही सभा अखेर आसरा परिसरातील लोकमान्य नगर मैदानात निश्चित करण्यात आली.
होम मैदानावर सभा होणार यासंदर्भातील बॅनर आणि माहिती पत्रके छापली आणि बऱ्याच प्रमाणात िवतरित केली. त्यामुळे अडचण निर्माण झाली. आता लोकमान्य नगर येथील मैदानावर सभेची तयारी सुरू झाल्याचे पक्षाने सांगितले.

न्यायबुद्धीने निर्णय घेणे अपेक्षित
शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सभेस कोठे मंजुरी द्यायची की नाही, हा निर्णय पोलिसांचा आहे. मात्र पोलिसांनी न्यायबुद्धीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अॅड. धनंजय माने, ज्येष्ठविधिज्ञ

न्यायालयातदाद मागता येईल
सभेसाठी पोलिसांनी स्थळ नाकारले असेल तो निर्णय मान्य नसेल तर पक्षाला न्यायालयात दाद मागता येते. न्यायालय ठरवेल काय चुकीचे काय बरोबर. अॅड. अब्बास काझी, ज्येष्ठ विधिज्ञ
बातम्या आणखी आहेत...