आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Owner Killing: Wife Said, Father Threaten Her Husband

आॅनर किलिंग: मुलीची फिर्याद; वडील, चुलत भावांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर/ सोलापूर - आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तलवार, सत्तूरने वार करून सोमनाथ बाळकृष्ण टाकणे (वय ३१, रा. पंढरपूर) याचा खून केल्याप्रकरणी मुलीचे वडील नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह त्यांच्या नात्यातील बाराजणांविरुद्ध शहर पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून चारजणांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संबंध तोडल्याने खुनानंतर बुधवारी रात्री त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. गुरुवारी (दि. ७) दुपारी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस संरक्षणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पृथ्वीराज भोसले, शैलेश ऊर्फ शैलेंद्र भोसले, प्रसाद शशिकांत भोसले, प्रवीण शशिकांत भोसले यांना पोलिस कोठडी सुनावली.

8 जण अटकेत, वडिलांनी खुनाची धमकी दिली होती
सौदामिनी सोमनाथ बाळकृष्ण टाकणे यांनी आठ जानेवारी २०१४ रोजी आंतरजातीय विवाह केला. विजापूर येथे विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने त्यांनी लग्न केले. काही दिवस तेथेच राहिले. त्यानंतर दोघे उस्मानाबादमधील सांजा चौकात भाड्याने खोली घेऊन राहिले. तेथे त्यांना एक मुलगा (हर्षवर्धन) झाला. दरम्यान, सोमनाथ हा तेली समाजातील होता. आपल्या मुलीने इतर जातीतील मुलाशी लग्न केल्याने सौदामिनीचे वडील नागेश भोसले यांच्यासह त्यांचे भावकीतील नातेवायीक त्या दोघांवर चिडून होते. आम्ही थोड्याच दिवसांत सोमनाथ याचा खून करू, असे वडील नागेश भोसले यांनी म्हणाले होते, असे सौदामिनी हिने फिर्यादीत म्हटले आहे.