आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या इफेड्रीन प्रकरणाचे पाक कनेक्शन, विकीने पाकिस्तानातील मित्राला विकले अमली पदार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- येथील चिंचोळी एमअायडीसीतील एव्हाॅन कंपनीत सापडलेल्या इफेड्रीन अमली पदार्थप्रकरणी ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी सध्या अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात अाहे. त्याच्या चौकशीत अमली पदार्थ पाकिस्तानमधील एका मित्राला त्याने विकल्याचे समोर अाले अाहे. याबाबत चौकशी सुरू असून, नेमकी माहिती समोर आलेली नाही.
 
मागील महिन्यात अमेरिकन पोलिसांनी गोस्वामीला अटक केली अाहे. ममता कुलकर्णीचा या गुन्ह्यात सहभाग असून, तिला अजून अटक झाली नाही. दरम्यान, सोलापूरच्या चिंचोळी एमअायडीसीतील एव्हाॅन कंपनीत जप्त करण्यात अालेले अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी ठाण्याच्या विशेष न्यायालयाने परवानगी दिली अाहे. लवकरच एक पथक सोलापुरात येऊन ते पदार्थ नष्ट करण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिसांकडून समजते. 
बातम्या आणखी आहेत...