आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा लाख वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी पंढरी सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आषाढी एकादशी सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देता याव्यात, यासाठी अत्यावश्यक सर्व कामे पूर्ण केली आहेत. पहिल्यांदाच ६५ एकरावर वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध केली आहे. ९० दिवसात बंधारा उभा केल्याने चंद्रभागा पात्रामध्ये पाणी उपलब्ध राहणार आहे. उघड्यावरील प्रातविधी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ हजार ५०० शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात असून गुरुवारपासून (दि. २३) प्रत्यक्षात याचा वापर सुरू होणार आहे.

आषाढी यात्रा पाच दिवसांवर आलेली आहे. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण आषाढी सोहळ्याचे नियोजन आयआरएस प्रणालीद्वारे केले आहे. आषाढी एकादशी साेमवारी (दि. २७) असली तरी चार दिवस अगोदरपासूनच भाविकांची गर्दी वाढते. त्यानुसार नदीकाठावरील ६५ एकर, दर्शन मंडप दर्शनरांग, वाखरी पालखी तळ, चंद्रभागा नदीकाठ याठिकाणी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

वाळवंटामध्ये उच्च न्यायालयाने तंबू राहुट्या उभारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे प्रशासनाला पुन्हा चंद्रभागा वाळवंटामध्ये वीज, पाणी रस्त्यांची सुविधा द्यावी लागणार आहे. सोमवारी सकाळपर्यंत याठिकाणी जिल्हा प्रशासाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तंबू, राहुट्या उभ्या करता येणार नसल्याचे फलक लावले होते. जिल्हा प्रशासनाला आता हे फलक हटवावे लागणार आहेत.

फक्त१० दिवसांत कामे पूर्ण : चंद्रभागानदीकाठीच्या ६५ एकरावर वारकऱ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांना वीज, पाणी, रस्ते, शौचालय ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही कामे आठ दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले असून गुरुवारपासून ही जागा प्रत्यक्षात वापरात येणार आहे. शिवाय ९० दिवसांमध्ये बांधण्यात आलेल्या गोपाळपूर बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

शौचालय उभारण्याचे काम वेगात
शहरवाखरी पालखी तळ याठिकाणी कायमस्वरूपी तात्पुरत्या स्वरूपाची १८,५०० शौचालये असणार आहेत. शहरात कायमस्वरूपी २१०० शौचालये आहेत. तात्पुरत्या स्वरूपाची अंबाबाई पटांगण ३००, चंद्रभागा बसस्थानक २००, भीमा बसस्थानक २००, वाखरी पालखी तळ ५००, रेल्वे स्थानक २००, मार्केट यार्ड २००, कवठेकर २०० याठिकाणी तर ६५ एकरावर ४००, चंद्रभागा काठावर ३००, वाखरी तळावर १००, शिवाजी चौक १००, भक्तीमार्गावर १०० शौचालयांची कामे सुरू आहेत.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
नदीतवाहने, जनावरे धुणे, कचरा टाकू नये. यात्रेकरूंनी नदीचे पाणी पिऊ नये, कचरा कचरापेटीतच टाकावा, सार्वजनिक रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकू नये तर घंटा गाडीकडे द्यावा. दशमी एकादशी द्वादशी यादिवशी घंटागाडी सकाळी रात्री अशी दोन वेळा निघेल याची घरमालक, मठाधिपती नागरिकांनी नोंद घ्यावी. आपत्तीप्रसंगी नगरपालिका टोल फ्री क्रमांक १८००२३३१९२३ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...