आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर जिल्हा निर्मिती शक्य नाही : फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासनानेराज्यात नवीन २२ जिल्हा निर्मितीची घोषणा केली आहे. यामध्ये पंढरपूर जिल्हा निर्मिती होणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केेले. शासनाने दिलेल्या निकषानुसार पंढरपूर स्वतंत्र जिल्हा निर्मिती शक्य नसल्याचे स्पष्ट झाले होते, त्याला आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुजोरा देत पंढरपूर जिल्हा निर्मितीच्या विषयाला पूर्णविराम दिला .
कॉ. मीनाक्षीताई साने गृहनिर्माण कार्यक्रमाकरता सोलापुरात आल्यानंतर विमानतळावर हायड्रोपोनिक्स चाऱ्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. विमानतळावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर विमानतळावर चहापान प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली.सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पत्रकाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्षांपूर्वी केली होती. जिल्हाधिकारी यांनी याबाबत शासनाला म्हणणे कळवले आहे.

हायड्रोपोनिक्सचाऱ्याला हिरवा कंदील : यावेळीहायड्रोपोनिक्स चारा निर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला . कमी कालावधीत चारा निर्मितीची ही सुलभ प्रक्रिया असून अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यादृष्टीने नियोेजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मुंढे यांना दिल्या. कृषी विभागाने तयार केलेला हायड्रोपोनिक्स चाऱ्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत चारा पाेहोचवा
हायड्रोपोनिक्सचारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन स्तरावर उपाययोजना कराव्यात. शिवाय प्रत्येक शेतकऱ्यांना याविषयी माहिती त्याचे प्रात्यक्षिक पाहता यावे, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, आयुक्त रवींद्र सेनगावकर, मनपा आयुक्त विजय काळम-पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, प्रभारी कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

नियोजितवेळेनुसार ११ वाजून मिनिटांनी येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान तब्बल ४० मिनिटे म्हणजेच ११ वाजून ४५ मिनिटांनी विमानतळावर उतरलेे. विमानतळावर स्वागतासाठी लोटलेल्या प्रमुख मान्यवरांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १२ वाजता कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले. विमानतळावरही भाजप शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांत गट-तट दिसून आले. िवमानतळावर मुख्यमंत्री आल्यानंतर नेत्यांमधील गट-तट कायम होते. पालकमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले तर महापालिकेच्या वतीने महापौर सुशीला आबुटे उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी स्वागत केले. यानंतर खासदार शरद बनसोडे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, सुधाकर परिचारक आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. विमानतळावरील १५ मिनिटांच्या कालावधीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीला पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चालत-चालतच चर्चा केली. याच कालावधीत भेटीसाठी आलेल्या मान्यवरांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.