आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपुरात नगराध्यक्षपदासह २१ जागा जिंकून परिचारक गटाने राखली सत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या ३४ जागांपैकी २१ जागांवर विजय मिळवून सत्ता अबाधित राखली. यात भाजपच्या चार जागांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेसच्या सात जागा आहेत. पाच अपक्ष निवडून आले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खातेही खोलता आले नाही.

१७ प्रभागांतील ३४ जागांवर १५५ उमेदवार रिंगणात होते तर नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार होते. सोमवारी सकाळी १० वाजता शासकीय गोदामात मतमोजणी झाली. तीर्थक्षेत्र आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांना १६९२० मते मिळाली. पंढरपूर - मंगळवेढा विकास आघाडीच्या साधना भोसले यांनी २० हजार ७५४ मेत मिळवून विजय मिळवला. शिवसेनेचे डाॅ. बी.पी.रोंगे यांना ४२३४, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील यांना ३९०४ मते मिळाली. प्रभाग १२ अ मध्ये भाग्यश्री शिंदे व अनिता ढवळे दोघींना १२६५ मते पडली. चिठ्ठीद्वारे भाग्यश्री शिंदे यांचा विजय झाला.


आघाडी व प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी : एक अ : अक्षय गंगेकर १७१६, दोन अ : करुण आंबरे १४१७, चार अ : अनुसया शिरसट २६२३, ब : विक्रम शिरसट २५६४, सात अ : सुजितकुमार सर्वगोड १७३७, ब : रेहाना बोहरी १७१८, आठ ब : संजय निंबाळकर १६०३, नऊ अ : लतिका डोके १३८५, ११ अ : रंजना पवार १४०१, ब : दगडू धोत्रे १५३७, १२ ब : विशाल मलपे १०८१, १४ अ : अर्चना रानगट ११७०, ब : गुरुदास अभ्यंकर १००७, १६ अ : विवेक परदेशी ११६६, १७ अ : मालन देवमारे ९९३, १७ ब : वामन बंदपट्टे १००२, १२ अ : भाग्यश्री शिंदे चिठ्ठीद्वारे विजयी. भाजप : पाच अ : अनिल अभंगराव २७६५, ब : सुप्रिया डांगे २४३४, सहा अ : शकुंतला नडगिरे २४७४, ब : सुजाता बडवे २६४३.

तीर्थक्षेत्र विकास आघाडी : दोन ब : लखन चौगुले १४६७, तीन अ : सुरेश नेहतराव १३२२, आठ अ : रुक्मिणी यादव २०३६, नऊ ब : सुधीर धोत्रे १०९५, १३ अ : सारिका साबळे ७५०, १५ अ : महादेव भालेराव १५८५, १५ ब : स्वाती धोत्रे १५३३. अपक्ष : एक ब : राजश्री गंगेकर १३९२, तीन ब : श्वेता डोंबे ७५६, दहा अ : सुरेखा पवार २८८८, १० ब : संदीप पवार १७७६, १३ ब : प्रशांत शिंदे ७५५, १६ ब : रेणुका घोडके ८४९.
बातम्या आणखी आहेत...