आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाड्यांसाठी राजकीय साठमारी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर / पंढरपूर - नगरपालिकेकडेप्रमुख दोन्ही आघाड्यांकडे ३५० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या आघाडीकडे नगरसेवक पदासाठी १७५ तर नगराध्यक्षपदासाठी १० जण इच्छुक आहेत. आमदार भारत भालके -कल्याण काळे यांच्या आघाडीकडे नगरसेवक पदासाठी १६० तर नगराध्यक्ष पदासाठी ११ जणांनी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरसेवक पदासाठी ५० जण इच्छुक आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व ३५ जागा लढवण्याची तयारी केली आहे. दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची गर्दी झाल्याने उमेदवारी मिळाल्यास ते डोकेदुखी ठरू शकते.

नगरपालिका निवडणुकीसाठी २४ अॉक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नाही. सध्या शहर विकास आघाडीने नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती घेतल्या आहेत. विठ्ठल परिवाराच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडील इच्छुकांनी आमदार भालके काळे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे. अद्याप त्यांच्या मुलाखती अथवा निवड प्रक्रिया व्हायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५० जणांनी उमेदवारी मागितली आहे. मनसेेने सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेकडून इच्छुकांची यादी तयार केली जात आहे.

२४लाखांचा कर भरणा : निवडणुकीसाठीअर्ज करण्यासाठी थकबाकी नसल्याचा दाखला लागतो. पाणीपट्टी, घरपट्टीतून २४ लाख रुपये जमा झाले आहेत.
^माजी आमदारसुधाकर परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आघाडीतील सर्व नेत्यांशी चर्चाही केली आहे. निष्ठावंत आणि चांगले कार्य करणाऱ्यांना उमेदवारी देणार आहे.''
- उमेश परिचारक, अध्यक्ष, शहर विकास आघाडी
^नगरसेवकआणिनगराध्यक्षपदासाठी जवळपास १६० जण इच्छुक आहेत. आमदार भारत भालके आणि कल्याण काळे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत उमेदवार निश्चित करून अर्ज दाखल करू.''
सुधीरधुमाळ, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र विकास आघाडी
सांगोल्यात दोन अर्ज
सांगाेला नगरपिरषदिनवडणुकीसाठी बुधवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरले. अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तीन दिवसांत नगरपालिकेला करापोटी ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रभाग एक सर्वसाधारणमधून उमेश ज्ञानू मंडले, प्रभाग दोन सर्वसाधारणमधून सुनील शंकर िबले यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, गेल्या तीन िदवसांपासून इच्छुक उमेदवार सूचक हे नाहरकत दाखला मिळवण्यासाठी नगरपरिषदेत गर्दी करत आहेत. तसेच घरपट्टी पाणीपट्टी भरणा केला जात आहे. येत्या तीन िदवसांत यामध्ये अजून भर पडणार अाहे. अाॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शहरातील सायबर कॅफेचालकांना प्रिशक्षण िदले अाहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार सायबर कॅफेचे उंबरठे िझजवत अाहेत. उमेदवारी अर्ज अाॅनलाईन भरून त्याची एक प्रत समक्ष िनवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याला द्यावयाची आहे.

कुर्डुवाडीत एक अर्ज
कुर्डुवाडी| नगरपरिषदेच्यानिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या ितसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल झाला. अद्याप प्रमुख पक्षांच्या आघाडी युतीसाठी वाटाघाटी सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस २९ अाॅक्टोबर आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक सात मधील सर्वसाधारण जागेसाठी संतोष अभिमान टोणपे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिमान वासुदेव टोणपे, लक्ष्मीबाई अभिमान टोणपे, संजय जवाहर भाळवणकर, जवाहर हिरालाल भाळवणकर महेश पांडुरंग भिसे हे सूचक आहेत. टोणपे यांनी यांनी कपबशी, पंतग शिट्टी चिन्हाची मागणी केली आहे. संजय शिंदे यांचा गट स्वाभिमानी शहर विकास आघाडीद्वारे निवडणूक लढवणार आहे. रिपाइंचे नेते बापूसाहेब जगताप हेही त्यांच्यासोबत आहेत. भाजपही या आघाडीत जाण्याची शक्यता आहे.

बार्शीत दोन अपक्षांचे अर्ज दाखल
बार्शी | नगरपालिकानिवडणुकीसाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब लागत अाहे. ही सर्व प्रक्रिया क्लिष्ट वेळखाऊ आहे. त्यामुळे आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णयशिथील करून आॅफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी राजकीय पक्षांतून जोर धरत आहे. दरम्यान, बुधवारी आमदार दिलीप सोपल माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नगरपालिकेत मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेऊन यात येत असलेल्या अडचणी सांगितल्या.

आॅफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी
सध्या राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचा अवधी आहे. त्यापैकी तीन दिवस उलटले आहेत. त्यामुळे आता उर्वरित तीन दिवसांत प्रशासनावर ताण पडणार आहे. इच्छुकांना अर्ज भरताना तो आॅनलाइन भरून त्याची सॉफ्ट कॉपी नगरपरिषदेत जमा करावयाची आहे. परंतु आॅनलाइन अर्ज भरण्याची पद्धत क्लिष्ट वेळखावू आहे. राज्यभरातून सर्व्हरवर ताण वाढत आहे. ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास वेळ लागत आहे. सगळ्याची पक्षांनी सर्वच इच्छुकांचे अर्ज भरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची संख्या मोठी आहे. सर्व्हरमुळे आॅनलाइन अर्ज भरण्याचा वेग मंदावत आहे. सर्वांचे अर्ज भरले जातील की, नाही याबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांना चिंता लागून राहिली आहे.

बार्शी नगरपालिकेच्यापंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी प्रत्येकी एक असे दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी अतुल इटकर, नगरसेवक पदासाठी १२ मधून धनंजय बारंगुळे या दोघांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. नगरपालिकेसाठी २० प्रभागांतून ४० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...