आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर अर्बन बँकेची आयकराकडून तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - हजार आणि पाचशेच्या नोटा रद्दच्या निर्णयानंतर पंढरपूर अर्बन बँकेत जवळपास १०० कोटी रुपये जमा झाले. या सर्व व्यवहाराची तपासणी व नोटांची मोजणी आयकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी केली. ८ नोव्हेंबर नंतर अचानक जमा झालेल्या मोठ्या रकमांची नेमकी किती खाती, बँकेतील लॉकर्स , जनधन खात्यातील जमा रकमा यांची तपासणी या पथकाने केली. बँकेने अलॉट केलेल्या काही लॉकरमध्येही मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळल्याचे वृत्त आहे.

नोटा बदलून देण्याच्या किंवा नोंदीत नसलेला पैसा बँकेतून नोंदीत आणला जातोय का? या संदर्भात तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी पंढरपूर अर्बन बँकेची तपासणी केल्याची माहिती सूत्राने दिली. या पथकात तीन अधिकारी आणि पाच कर्मचारी असे सात जण होते. ही तपासणी सुरू असताना बँकेत अन्य कोणालाही आत प्रवेश नव्हता. बाहेर पोलिस बंदोबस्तही होता. तपासण्यासाठी आहलेल्या पथकात पुणे, नगर, कोल्हापूर येथील अधिकारी, कर्मचारी होते असे सांगण्यात आले.

गुरुवारपासून सुरू असलेल्या या तपासणीत बँकेत जमा झालेल्या १०० कोटी रुपयांच्या रकमेची मोजदाद करण्यात आली. बँकेत असलेले शेतकरी, व्यापारी यांची खाते किती आहेत, त्यात किती रकमा जमा आहेत, किती जणांना आणि कधी कर्जपुरवठा झाला आहे? दोन, अडीच लाख रुपये अचानक कोणी जमा केले आहेत का? आदींची माहिती
घेण्यासाठी पथकाने बँकेचे सर्व कागदोपत्री व्यवहार तसेच नाणेवारी आदींची मोजदादही केली.
लॉकर्स चीही तपासणी
आयकर विभागाच्या या पथकाने बँकेतील लॉकर्सचीही तापसणी केली. यात काही लॉकर्स कोणाच्याही नावे असताना त्यातही रकमा असल्याचे आढळून आल्याची चर्चा होती. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पण या पथकाने लॉकर्स तपासले याला सूत्राने दुजोरा दिला. त्यात किती रकमा आढळल्या या बाबत माहिती देण्यास सूत्राने नकार दिली
बातम्या आणखी आहेत...