आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: माऊलींच्‍या पादुकांचे नीरा स्नान थाटात, आजचा मुक्‍काम लोणंदमध्‍ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्‍या पादुकांचे शाही नीरा स्नान मोठ्या थाटात पार पडले. स्‍थानानंतर माऊलींची पालखी हजारो भाविकांच्‍या साथीने साता-याकडे निघाली. लोणंदमध्‍ये पालखीचा आजचा मुक्‍काम असणार आहे.
संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या जयघोषात भाविक शाही स्‍नानाच्‍या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अबालवृद्ध भाविकांनी यावेळी मोठ्या संख्‍येने गर्दी केली होती. स्‍नानानंतर माऊलींची पालखी साता-याकडे निघाली आहे.
नेहमीच्या प्रथेनुसार आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 28 जून रोजी झाले. विविध मुक्कामांनंतर 14 जुलै रोजी पालखी सोहळा पंढरीत प्रवेश करेल. यंदा माउलींचा पालखी सोहळा वाल्हे आणि माळशिरस येथे गावातून न जाता थेट मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर विसावणार आहे. दरम्यान, यंदा माउलींची पालखी वाहून नेण्याचा मान आळंदी येथील संतोष वहिले यांच्या बैलजोडीला मिळाला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, शाही स्‍नानाचे फोटो, व्‍हिडियो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...