आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीला विठ्ठल - रखुमाईचे मंदिर रोषणाईने लखलखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल- रखुमाईच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. आषाढी यात्रेत दरवर्षी मंदिर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी झगमगून टाकण्यात येते. पुण्याच्या विनोद जाधव नीलेश जाधव यांच्या शिवदत्त डेकोरेशनने ही सेवा मोफत पुरवली आहे. त्यामुळे सध्या विठू-रखुमाईचे मंदिर रोषणाईने लखालख दिसत आहे . 
विठूरायाच्या भेटीसाठी जगद््गुरू संत तुकाराम महाराज संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान श्रीक्षेत्र देहू आळंदीतून झाले आहे. लाखोंच्या संख्येने वैष्णव श्री विठूरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने मंदिराला लाखो दीपमाळेची रोषणाई करून माउली भक्तांच्या स्वागतास सुसज्ज केले आहे. 

यावेळी प्रथमच मुळशी (पुणे) येथील विनोद जाधव आणि नीलेश जाधव बंधूंनी संपूर्ण मंदिर तसेच मंदिराच्या बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. जुलैच्या पौर्णिमेपर्यंत ही रोषणाई झगमगीत राहणार आहे. सध्या मंदिरात ठिकठिकाणी आकर्षक झुंबर, क्रिपींग, झालर, लाइट डेकोरेशन लक्षवेधी ठरत आहे. 

प्रशासन यंत्रणा सज्ज 
आषाढी वारी नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपालिका, पोलिस आिण महसूल प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यंत्रणा गतिमान करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे २८ जून रोजी नातेपुते येथे होत अाहे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या साइड पट्टीची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. 

^पंढरीच्या श्रीविठ्ठल रखुमाईवर आमची श्रद्धा आहे. विद्युत रोषणाई करण्याची आमची इच्छा होती. मंदिराला आमच्याकडून आकर्षक विद्युत रोषणाई व्हावी. यासाठी मंदिर समितीकडे परवानगी मागितली. त्यांनी या कामाला तत्काळ अनुमती दिली. यानिमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याची संधी आम्हा मिळाली.'' विनोदजाधव, नेरे, ता. मुळशी, पुणे 
 
बातम्या आणखी आहेत...