आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पांडुरंग' देणार ३०० रुपयांचा तिसरा हप्ता, एफआरपी देणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज - श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊसबिलापोटी प्रतिटन ३०० रुपयांचा तिसरा हप्ता ऊस उत्पादकांच्या नावे जमा केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. हजार १६३ रुपयांप्रमाणे एफआरपी देणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना असून, कामगारांना १८ टक्के बोनस देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पांडुरंग कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊस बिलापोटी यापूर्वी हजार ८६३ रुपये अदा केले आहेत. आता ३०० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यासाठी कारखान्याने ३८ कोटी ६४ लाखांची तरतूद केली आहे. हजार १६३ एवढी एफआरपी होत असून, ती सर्व अदा करणारा पांडुरंग हा जिल्ह्यातील पहिलाच कारखाना असल्याचे सुधाकर परिचारक म्हणाले.

कारखान्याच्या कामगारांना दिवाळीसाठी १८ टक्के बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दिवाळी पाडव्यासाठी २० रुपये किलोप्रमाणे कायम कामगारांना ५० किलो हंगामी कामगारांना ३० किलो साखर देण्यात येईल. ऊस उत्पादक अनामत धारकांना प्रतिशेअर ६० किलो साखर २० रुपये किलोप्रमाणे दिवाळी पाडव्याला देण्यात येणार आहे.

यंदाच्या हंगामात पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. गत १४ दिवसांत ८१ हजार टानाचे गाळप करून ७६ हजार ३०० पोती साखर उत्पादित झाली आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६० लाख ६८ हजार ६५५ युनिट वीज निर्माण करून ३६ लाख युनिट वीज विक्री झाली आहे. -यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक
बातम्या आणखी आहेत...