आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्र, राज्याप्रमाणे बार्शीतही सत्तेचे समीकरण साधा : मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - केंद्रात राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. सरकार सर्वसामान्यांसाठी अतिशय कल्याणकारी योजना राबवत आहे. एकाच विचारांची टीम असल्यास विकासाला आणखी गती मिळणार आहे. त्यामुळे विकासाचा घास आपल्या ताटामध्ये वाढण्यासाठी बार्शीला या विकासाच्या पंगतीत बसवा, असे प्रतिपादन महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बार्शी नगरपालिका निवडणुकीत भाजप, रासप रिपाइं उमेदवारांच्या प्रचारार्थ उपळाई रोड येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप नेते राजेंद्र मिरगणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, रासपचे संतोष ठोंगे, रिपाइंचे वीरेंद्र कांबळे, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. वासुदेव ढगे, जॉन चोप्रा उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी बार्शी नगरपालिकेला मिळण्यासाठी भाजपला सत्ता द्या. केंद्र शासनाच्या धोरणांमुळेच ग्रामीण भागाचा विकास होत आहे. यापूर्वीच्या सरकारने जातीपातीचे राजकारण करत सर्वसामान्यांची दिशाभूल केली. भ्रष्टाचारातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा कार्यक्रम राबवला. त्यामुळे बहुजन समाज देशोधडीला लागला. भविष्यात भाजप सरकारचे धोरण देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचे आहे. पाचशे हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केवळ काळा पैसा जमवणाऱ्यांना चपराक आहे, असे त्या म्हणाल्या.

मिरगणे म्हणाले, भाजपचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माढा-वैराग-उस्मानाबाद या महामार्गासाठी १६ कोटी रुपयांचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रस्ते इतर कामांसाठी कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.

पंकजा नावातच आहे राजकारण
मामा (स्व.) प्रमोद महाजन, वडील (स्व.) गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी होत असताना राजकारण जवळून ेपाहिले.माझ्या जन्मापूर्वी आई-वडिलांनी मुलगी झाली तर पंकजा, मुलगा झाला तर पंकज असे नाव ठेवण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणेच माझे नाव पंकजा ठेवले. तेच भाजपचे निवडणुकीचे पंकज अर्थात कमळ हे चिन्ह असल्याचे सांगत पंकजा यांनी आपल्या नावातील गुपीत उलघडले.
बातम्या आणखी आहेत...