आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्र्यांना निमंत्रण नाही, वाद टाळण्यासाठी कार्यशाळा केली रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंतप्रधान आवास योजनेची सोमवारची नियोजित कार्यशाळा रद्द झाली. पालकमंत्र्यांना त्याचे निमंत्रण नसल्याची हरकत भाजपच्या नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून प्रशासनाने कार्यशाळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

स्मार्ट सिटी कामाच्या उद््घाटनासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण नसल्याने नुकताच वाद झाला होता. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादात भर पडली असती. नगरसेवकांसाठी ही कार्यशाळा सोमवारी महापालिका सभागृहात होणार होती. तिचे उद््घाटक महापौर सुशीला आबुटे होत्या. आधीत्यांच्या निमंत्रणपत्रिकेत विरोधी पक्षनेत्याचे नाव नव्हते. आक्षेप घेतल्यानंतर नरेंद्र काळे यांचे नाव आले.

केंद्राची योजना असल्याने पालकमंत्री देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख आदी लोकप्रतिनिधींची नावे अपेक्षित आहेत. ती नसल्याने कार्यशाळेवर बहिष्कार घालण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिला. आयुक्तांकडे नाराजीही व्यक्त केली होती.

नेटकॅफेचालकांची कार्यशाळा
पंतप्रधानआवास योजना लाभार्थींना फॉर्म आॅनलाइन भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सुमारे १०० नेट कॅफेचालकांकडून अर्ज भरता येईल. त्यासाठी नेट कॅफेचालकांना १०० रुपयांपर्यंत फी घेता येणार आहे. त्या नेट कॅफेचालकांची कार्यशाळा सोमवारी महापालिका योेजनेतील कार्यालयात घेण्यात अाली. यात प्रकल्प सल्लागार गोकुळ चितारी, योजनेचे अधिकारी लक्ष्मण बाके, दत्तात्रय चौगुले यांनी मार्गदर्शन केले.

बोलावणे आवश्यक
ही योजनाकेंद्र राज्य सरकारची आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांसह खासदार आणि आमदारांना बोलवणे आवश्यक होते. याबाबत मी आयुक्तांकडे तोंडी तक्रार करत पालकमंत्र्यांना बोलावण्याची विनंती केली.” सुरेशपाटील, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...