आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parent Students Dandiya Festival Events In Solapur

पालक- विद्यार्थिनींचा रंगला दांडिया महोत्सव, सहस्त्रार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला मातेचा जागर उत्साहात करण्यात आला. त्यानिमित्त विविध ठिकाणी पूजा, दुर्गापाठ पठण, कुमारिकांचे पूजन, जागरण याचे आयोजन करण्यात आले होते. दांडियामध्ये विद्यार्थिनी, पालकांनीही सहभाग घेतला.
क्षत्रियगल्लीत सहस्त्रार्जुन युवती प्रतिष्ठानच्या वतीने महिला युवतींसाठी विशेष दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला युवतींनी मोठ्या जोशात आपल्या गरबा दांडियाचे सादरीकरण केले. यावेळी स्पर्धेत पूजला मेहेरवाड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या उद्घाटनाला शक्ती पूजा मंडळाचे सुरेश बिद्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी ज्योती मेहेरवाड, रेखा रोडगे, पूजा मिरजकर, शोभा काल्हापुरे, श्रनिवास रोडगे क्षत्रिय गल्लीतील युवकांनी परिश्रम घेतले.

सोलापूर भगवे फेटे, हाती लेझीम आणि वर दांडियाची ताल अशा विविध प्रकारच्या नृत्याविष्काराने पालक विद्यार्थिनींनी सजलेला दांडिया महोत्सव झाला. निमित्त होते विवेक बहुउद्देशीय संस्था आयोजित उदय विकास विद्यालयात आयोजित पालक विद्यार्थिनी दांडिया महोत्सवाचे. उद्घाटनप्रसंगी महिला बालकल्याणच्या सभापती अश्विनी जाधव आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अरुणा वर्मा, नगरसेविका निर्मला जाधव, संस्थेच्या उपाध्यक्षा शारदाबाई गायकवाड, हिरालाल गायकवाड ,अमोल गायकवाड, संयोजिका कीर्ती गायकवाड उपस्थित होते.

कुंभार वेस येथे क्षत्रिय समाज नवरात्रोत्सव मंडळाच्या दांडीयामध्ये रंगून गेलेल्या महिला.
मंगळवारी सायंकाळी डीआरएम कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा भोडला कार्यक्रम झाला. यावेळी सुमारे शंभर महिलांनी सहभाग नोंदविला. महिलांनी यावेळी ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, तुझी करील सेवा अशा पारंपरिक गाण्यांवर फेर धरला.