आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’त हद्दवाढ भागाचा समावेश करा, परिवर्तन फाउंडेशनचे जिल्‍हाधिकारी कार्यालयाला निवदेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेत शहराच्या हद्दवाढ भागाचाही समावेश करावा, अशी मागणी परिवर्तन फाउंडेशनने केली आहे. त्याची प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातही देण्यात आली. शहरातील सुमारे ३० टक्के नागरिक हद्दवाढ भागात राहतात. परंतु तिथे मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्या करण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे हद्दवाढ भागातच या निधीचा खर्च करावा, असे निवेदनात म्हटले आहे. 

स्मार्ट सिटीत हद्दवाढ भागाचा समावेश नाही. त्यामुळे ३० टक्के नागरिक या विकासापासून वंचित राहणार आहेत. त्यांना या आधुनिक सुविधांचा लाभ मिळण्यासाठी सर्वंकष स्मार्ट सिटी योजना राबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळात आदित्य म्हेत्रे, साजिश फराळ, राहुल शिंगे, इलियास रजा, वसीम शेख, अभिषेक म्हेत्रे, एस. एम. गलाटे, सलीम शेख, रहीम शेख आदी उपस्थित होते. 

स्मार्ट सिटी योजनेत शहराच्या हद्दवाढ भागाचा समावेश करण्याची मागणी परिवर्तन फाउंडेशनने केली. त्याचे निवेदन देताना आदित्य म्हेत्रे, साजिद फराश, राहुल शिंगे, इलियास रजा, वसीम शेख, अभिषेक म्हेत्रे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...