आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवाशाचा प्रामाणिकपणा, सव्वा लाखासह बॅग केली परत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- रेल्वेतून उतरताना प्रवाशाने गडबडीत सोबतच्या प्रवाशाची बॅग घेतली. सोलापूर स्थानकावर उतरल्यानंतर त्याला ही बॅग आपली नसून अन्य प्रवाशाची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ रेल्वे स्थानकावरील आरपीएफ कॉन्स्टेबलकडे स्वाधीन केली. 

 

आरपीएफ बॅगेची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यात लाख २३ हजार रुपयांचे दागिने आढळून आले. तर दुसरीकडे दुधनी स्थानकावर एका महिला बॅग चोरीला गेल्याची तक्रार दिली. दरम्यान तक्रारदार महिलेशी संपर्क साधून संबंधित बॅग स्वाधीन केली. ही घटना रविवारी चेन्नई -मुंबई एक्स्प्रेसमध्ये घडली. चेन्नई -मुंबई एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या अतिश चिंचोळी (रा. सोलापूर) यांनी गाडीतून उतरताना नजरचुकीने दुसऱ्या महिला प्रवाशाची बॅग घेतली होती. गाडीतून उतरल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली. त्यांनी आरपीएफकडे बॅग सुपूर्द केली. दरम्यान दुधनीत बॅग चोरीला गेल्याची तक्रार आली. आरपीएफ निरीक्षक पी. अग्निहोत्री यांनी तत्काळ संबंधित तक्रारदार महिलेशी संपर्क साधला आपली बॅग सोलापूर आरपीएफच्या ताब्यात असल्याचे सांगितले. आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून बॅग नायर यांच्या स्वाधीन करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...