आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेचा दावा फोल, टपावरील प्रवास रोखला नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेगाडीच्या डब्यावर बसून केला जाणारा प्रवास रोखणार असल्याचा रेल्वे पोलिस दलाचा दावा फोल ठरला. पोलिसांनी डब्याच्या टपावरील प्रवास रोखण्यासाठी विविध स्थानकांवर आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र त्यांना पूर्ण यश आले नाही. काही भाविकांनी टपावर बसून प्रवास केला. 
 
दरवर्षी कर्नाटकहून विशेष करून विजापूर, रायचूर, वाडी स्थानकावरून सोलापूरला येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांच्या छतावर बसून प्रवास करू नये म्हणून आरपीएफ कर्मचारी वाडी, रायचूर विजापूर स्थानकावरच आरपीएफ कर्मचाऱ्यांना नियुक्त करून भाविकांना रेल्वेच्या टपावर बसू देणार नसल्याचे सहायक सुरक्षा आयुक्त एस. एस. साळवे यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी तसे झाले नाही. बुधवारी विजापूर, रायचूरहून येणाऱ्या पॅसेंजर गाडीच्या छतावर बसून प्रवास केला. या संदर्भात साळवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मोबाइलवर उपलब्ध झाले नाहीत. 
 
 
बातम्या आणखी आहेत...