आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी वाहन कर्ज योजनेत गैरव्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रवासी वाहन कर्ज वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. कर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तरीही त्याला वाहन देण्यात आले. वर्षभरात केवळ एकाच कर्जदाराने हफ्ता दिला. याहूनही गंभीर बाब म्हणजे एकाच्या नावावर मंजूर वाहन भलत्याच व्यक्तीला वितरित करण्यात आले आहे.
गुन्हे अन्वेषण खात्याने (सीआयडी) याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल मागितला होता. त्याप्रमाणे कार्यालयाने अहवाल सुपूर्द केला. अहवालात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. महामंडळाने मागील वर्षी जून ते नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यातील आठ जणांना वाहनांसाठी कर्ज दिले. यात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा तपास सुरू आहे.

दीपक कसबे यांना मंजूर १६ लाख ३६ हजार रुपयांचे ‘एक्सयूव्ही’ (एमएच४५ ७१७१) वाहन रवींद्र वाघमारे यांना देण्यात आले. किशोर कांबळे यांच्या नावावर इनोव्हा (एमएच४५, एक्स १०१०) आहे. ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे वापरत होते. दोन दिवसांपूर्वीच ‘सीआयडी’ने हे वाहन जमा करून घेतले आहे.

वाहनांसाठी कोटी १० लाखांचे कर्ज
साठेमहामंडळाकडून प्रवासी वाहन खरेदीसाठी जिल्ह्यातील आठजण पात्र ठरले. यामध्ये माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथील बाळासाहेब प्रभाकर साठे धनाजी ज्ञानेश्वर वाघमारे यांना ‘बोलेरो’, खंडाळी येथील पांडुरंग गोविंद कदम किशाेर अशोक कांबळे यांना ‘इनोव्हा’, खंडाळी येथील रवींद्र महादेव वाघमारे, पंढरपूर येथील दिलीप नामदेव देवकुळे कल्याण सौदागर मोरे यांना महिंद्रा कंपनीची ‘एक्सयूव्ही’ तर सुनील बचुटे यांना होंडा कंपनीची ‘अमेझ’ वाहन याचा समावेश आहे. यासाठी महामंडळाने कोटी १० लाख ५३ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. खरेदीनंतर मोरे वगळता एकाही कर्जदाराने हप्ता भरला नाही. कर्जदार साठे वगळता अन्य एकाही कर्जदाराने कागदपत्रे जमा केलेली नाहीत.

मोहोळमतदारसंघामध्ये ९० टक्के कर्ज वितरण
आमदाररमेश कदम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात १० कोटी ६१ लाख ४७ हजार रुपयांपैकी ९० टक्के रकमेचे वाटप मोहोळ मतदारसंघात केले आहे. एमएसवाय योजनेंतर्गत हजार ९३१ महिलांना कोटी ८४ लाख ९६ हजार ३९८ रुपयांचे वाटप केले.