आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरूच, प्रवाशांचे हाल; खासगी वाहतूकदारांची दिवाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागण्यांच्या पूर्तता झाल्याने एसटी कामागार संघटनेचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी संपाची तीव्रता अधिक जाणवली. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन दिवसांचा संप झाला. यापूर्वी अनेक संप झाले. पण ते एकदिवसाच्या पुढे कधी गेलेच नाही.
 
यंदा मात्र प्रथमतच दुस ऱ्या दिवशीही संपच सुरुच राहिला. तर दुसरीकडे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बुधवारी सोलापूर बसस्थानकावर शुकशुकाट होता. बसस्थानकाच्या बाहेर मात्र खासगी वाहतूकदारांनी अतिरिक्त भाडे आकारून सेवा देण्यात येत होती. 
 
राज्य सरकार महाराष्ट्र एसटी कर्मचारी आयोग कृती समिती यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने बुधवारी संप सुरूच राहिला. सोलापूर विभागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संप शांततेत सुरू होता. सोलापूर बसस्थानकावरुन बुधवारी एकही गाडी सुटली नाही अन्य विभागाची गाडी आली देखिल नाही. बस स्थानकाच्या बाहेर, रामलाल चौक, सात रस्ता परिसरात खासगी वाहतुकीला मागणी होती. काही प्रवासी रिक्षातूनच अक्कलकोट गाठले. खासगी वाहतुकदारांनी नियमित भाडयापेक्षा ५० ते १०० रुपये जास्तीचे आकारले. 
 
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या संपामुळे बुधवारीही सोलापूर एसटी स्थानकावर ऐन दिवाळीतही असा शुकशुकाट दिसून आला. तर दुसरीकडे खासगी वाहनांकडे प्रवाशांची गर्दी झाली होती. 
 
१२ संघटना संपात सहभागी 
एसटीकर्मचाऱ्यांच्या संपात १२ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सर्व संघटना एकत्रित राहिल्याने त्यांच्यात फूट पडली नाही. या संपात एसटी कामगार संघटनेसह, इंटक काँग्रेेस, क्रास्टाइब कामगार संघटना, संघर्ष ग्रुप, कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघ , चालक वाहक-मेकॅनिक कर्मचारी संघ, विदर्भ कामगार संघटना, बहुजन संघटना, आरपीआय आदी संघटनांचा समावेश आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...