आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना साेलापूरातून मिळणार पासपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नागपूर कार्यालयांतर्गत असलेले लातूर, उस्मानाबाद, नांदेड व परभणी तर मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत असलेल्या जालना व बीड या जिल्ह्यातील नागरिकांना आता सोलापूर पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट देण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे, अशी माहिती क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. 
 
मुंबई विभागीय कार्यालयातून औरंगाबाद, मुंबई शहर, मुंबई ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, रायगड, ठाणे व  नाशिक तर नागपूर विभागीय कार्यालयातून अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोेंदिया, हिंगोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढता येणार आहे. आता नागपूर कार्यालयांतर्गत असलेले लातूर, उस्मानाबाद, नांदेड व परभणी हे जिल्हे वगळून पुणे विभागीय कार्यालयास जोडले आहेत. 

केंद्र शासनाने सोलापूर व कोल्हापूरचे पासपोर्ट लघु सेवा केंद्र सुरू केल्याने नागपूर व मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत असलेले जिल्हे पुणे विभागीय कार्यालयास जोडले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...