आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिपन’मध्येच पासपोर्ट आॅफिस, दीड महिन्यात कामकाज सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या वर्षभरापासून शहरात पासपोर्ट कार्यालयासाठी सुरू असलेला जागेचा शोध संपला. अखेर रिपन हॉलमध्येच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यास महापालिकेने होकार दिला. महापौर सुशीला आबुटे यांनी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांच्याकडे हॉलचा ताबाही दिला. पासपोर्ट कार्यालयास जागा उपलब्ध झाल्याने खऱ्या अर्थाने स्मार्ट सोलापूर संकल्पनेला सुरुवात झाली आहे. या कार्यालयामध्ये पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, मुद्रांक जिल्हाधिकारी साहेबराव दुतोंडे, भूमी मालमत्ता अधीक्षक सारिका आकुलवार, मनपाचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, पक्षनेते संजय हेमगड्डी, नरेंद्र काळे, रियाज हुंडेकरी, भाजपचे सरचिटणीस विक्रम देशमुख, विवेक पंडित आदी उपस्थित होते. पासपोर्ट कार्यालयास विदेश मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर गेले वर्षभर जागेचा शोध सुरू होता. अखेर रिपन हॉलला पासपोर्ट अधिकारी यांनी पसंती दर्शविली. त्यास काही संघटनांनी विरोध करीत इतर ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती.
महिनाभरात कार्यालयाचे नूतनीकरण
सोलापूरलासुरू होत असलेले पासपोर्ट कार्यालय विभागातील जिल्ह्यांसाठी सोयीचे राहणार आहे. सोलापूर येथील कार्यालयात पासपोर्टसाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर सातारा जिल्ह्यातील नागरिकही अर्ज करू शकतात. प्रत्यक्षात सेवा सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद लातूर जिल्हाही जोडून घेण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येईल. लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विदेश मंत्रालयाने देशात चार ठिकाणी पासपोर्ट कार्यालयास मंजुरी दिली, त्यापैकी सोलापूरचे कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पासपोर्ट क्षत्रीय अधिकारी गोतसुर्वे म्हणाले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिपन हॉलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारी दुपारी वाजता महापौर सुशीला आबुटे यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांच्याकडे रिपन हॉलचा ताबा दिला.
पासपोर्ट कार्यालयासाठीजागेची मागणी करण्यात आली. आम्ही तातडीने ठराव करून रिपन हॉलची जागा देण्यास मंजुरी दिली. सुशीला आबुटे, महापौर
पासपोर्ट कार्यालयामुळे सोलापूरचा विकास होण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळण्यास मदत होईल. इतर जिल्ह्यातील नागरिकांचीही सोय होईल. रणजित कुमार,जिल्हाधिकारी
रिपन हॉल वर्षासाठी पासपोर्ट कार्यालयास देण्यात आला. आता या जुन्या वास्तूचे चांगल्या प्रकारे जतनही होईल. बाहेरील काही लोक शहरात आल्यानंतर आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल. विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिपन हॉलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारी दुपारी वाजता महापौर सुशीला आबुटे यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांच्याकडे रिपन हॉलचा ताबा दिला.
बातम्या आणखी आहेत...