आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक लोक बसल्याने लिफ्ट बंद, सुदैवाने सर्व सुखरूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्रीछत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉकमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले. त्यामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजता तिसऱ्या मजल्यावरून खाली येताना लिफ्ट मध्येच थांबली. लोकांनी आरडाओरड केल्याने त्यांना पाच मिनिटात काढण्यात आले. सुदैवाने यात कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. लिफ्टमध्ये चालकच नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

सिव्हिलमधील बी ब्लॉकमध्ये चार लिफ्ट आहेत. त्यापैकी दोन बंद आहेत, दोन चालू आहेत. साधारण एक लिफ्टमध्ये एक हजार १० किलोग्रॅमचे वजन वाहून नेण्याची क्षमता असते. सुमारे १० लोक एकावेळी लिफ्टचा वापर करू शकतात. मात्र, गुरुवारी सकाळी अकरा वाजता बी ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावरून खाली लिफ्टमध्ये २० हून अधिक लोक घुसले. त्यामुळे काळ चालल्यानंतर लिफ्ट थांबली. लिफ्टचा दरवाजा बंद असल्यामुळे काहीच करता येईना. अखेर लिफ्टमधील नागरिकांनी ओरडण्यास सुरुवात केली. काही नर्सेस यांनी वैद्यकीय अधीक्षकांना कळविले. त्यानंतर तत्काळ हालचाली करून थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन किल्लीद्वारे दरवाजा काढून आतील नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

ब्लॉकमधील लिफ्ट कायम बंद अवस्थेत
सिव्हिलमध्ये बी ब्लॉकमध्ये लिफ्ट आहेत. परंतु बिल्डिंगमधील लिफ्ट अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांना नेताना नातेवाईक वॉर्डबाॅय यांना कसरत करावी लागते. बी ब्लॉकमध्ये चार लिफ्टपैकी दोन चालू आहे. मात्र, त्याचाही वापर व्यवस्थित होत नाही.

^सिव्हिलमध्ये अधिकलोक बसल्याने लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरच थांबली. मात्र, तातडीने हालचाल करून पाच मिनिटांत नागरिकांना लिफ्टमधून बाहेर काढले. अनुचित प्रकार घडला नाही. लिफ्टमध्ये कमी लोक बसतील याची काळजी घेऊ. डॉ.औदुंबर मस्के,वैद्यकीय अधीक्षक

लिफ्टमन नियुक्ती असतानाही घटना
सिव्हिलमध्ये लिफ्ट २४ तास चालू असते. याकरिता लिफ्टमन तैनात आहेत. लिफ्टमध्ये बऱ्याचवेळा लिफ्टमन नसतात. बहुतेक ग्राऊण्ड फ्लोअरवरच थांबतात. त्यामुळे लिफ्ट वरून खाली येताना क्षमतेपेक्षा जास्त लोक बसतात. त्यामुळे लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडतात.
बातम्या आणखी आहेत...