आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाभूल करणाऱ्यांस जनता जागा दाखवेल, शिंदे यांची मोदी सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून लोकसभा विधानसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल सत्ताधारी भाजपने केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवतील, असे मत माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

काँग्रेसभवन येथे बुधवारी आयोजिलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक रोहित टिळक, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, कल्याण काळे, अशपाक बळोरगी, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, पंचायत समिती सभापती गुरुनाथ म्हेत्रे, जिल्हा महिला अध्यक्ष साधना उगले, एनएसयुआयचे अध्यक्ष गणेश डोंगरे, सुरेश कोळेकर, सौदागर जाधव, भीमाशंकर कापसे आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले,“राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघाली. यापूर्वी पावसाला सुरवात झाल्यानंतर सरकाराने दुष्काळ जाहीर केला. प्रशासन सरकार एेकत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत होते. वाढती महागाई, बेरोजगारीचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून काळा पैसा आणण्याच्या नुसत्या घोषणा होतात. त्यामुळे अच्छे दिन जनतेला पूर्णपणे कळून चुकले असून यापुढे सत्ताधाऱ्यांना बुरे दिन येत असल्याचे सांगून सत्ता गेली तरी संघर्ष करणे सोडू नका, असे त्यांनी सांगितले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पक्षनिरीक्षक टिळक म्हणाले,“खोटी आश्वासन देऊन जनतेची फसवणूक भाजपने केली असून जनता त्यांना वैतागली आहे. काँग्रेसमध्ये युवकांना प्राधान्य देण्यात येणार असून युवक महिलांनी मोठ्या संख्येने पक्षात सक्रीत व्हावे.”
आमदार शिंदे म्हणाल्या,“पंतप्रधान मोदींनी परदेश दौऱ्यासाठी जेवढा पैसा खर्च केला, तेवढाच शेतकऱ्यांसाठी खर्च केला असता तर शेतकरी कर्जमुक्त झाला असता आत्महत्या थांबतील. स्मार्टसिटी फक्त शहरापुरतीच असून ग्रामीण भाग विकासापासून वंचित आहे.” शहरं स्मार्ट करण्याएेवजी गावं स्मार्ट करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...