आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमिशन वाढवा; अन्यथा दर रविवारी पेट्रोलपंप बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास नोव्हेंबरनंतर दर रविवारी सरकारी सुटीला पंप बंद ठेवण्यात येतील, असा इशारा 'फेमपाडा'चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिला. खर्च कपातीसाठी हे पाऊल आहे.
सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनची शनिवारी बैठक झाली. तीत लोध यांनी माहिती दिली. मंचावर फेमपाडाचे उपाध्यक्ष शैलेश मेहता, ट्रान्सपोर्ट विभागाचे वीरेश मेहता, सोलापूर असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे -देशमुख, माजी अध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव महेंद्र लोकरे, मार्गदर्शक पूर्ण चंद्रराव, डॉ. सिद्धेश्वर वाले, नंदकिशोर बलदवा आदी उपस्थित होते.
चंद्रा आयोगाच्या शिफारशी लागू करा
^२०११मध्येअपूर्व चंद्रा आयोगाने प्रत्येक लिटर मागे पंप चालकास २.९८ पैसे देण्याची शिफारस केली होती. सध्या २.४६ पैसे कमिशन दिले जाते. याचा विचार केल्यास तेल कंपन्या प्रत्येक पंपचालकास ५५ लाख रुपये देणे लागतात. उदयलोध, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन (फेमपाडा)

आंदोलन असे
२६ऑक्टोबर : सायं. ते ७.१५ विक्री बंद
नोव्हेंबर : पंपचालक इंधनाची उचल करणार नाही
नोव्हेंबर : सकाळी ते सायं. वाजेपर्यंतच सुरू
पुढे : सरकारी सुटी दर रविवारी पेट्रोल पंप बंद
मागण्या अशा
कमिशन: चंद्रा आयोगानुसार २.९८ पैसे प्रति लिटर
इथेनॉल : मिश्रणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे सांगा
एक्झिट : व्यवसायातून बाहेर पडण्याची मुभा द्यावी
लोकांना फटका
पंपचालककमिशनवाढ अन्य मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. तेल कंपन्यांना जेरीस आणण्याच्या हेतूने नोव्हेंबरपासून होणाऱ्या या आंदोलनाचा वाहनचालकांना फटका बसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...