आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीयूषच्या मृत्यूचा कळवळा नाहीच, श्रेयासाठी राजकारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ड्रेनेज चेंबरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या पीयूष वळसंगकर या मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यावरून मंगळवारी महापालिकेत राजकारण रंगले. मनपात दुपारी झालेल्या स्थायी सभेत महापौरांना विचारता मदत करण्याचा परस्पर निर्णय घेण्यात आला. यानंतर सायंकाळी महापौरांनी मनपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेत स्थायीतील ठराव खोडून काढत आर्थिक मदत जाहीर केली. मुलाच्या मृत्यूच्या कळवळ्यापेक्षा मदतीचे श्रेय घेण्याची चुरस यानिमित्त पाहायला मिळाली. दरम्यान मक्तेदाराकडून पाच लाख, सर्वेेक्षण कंपनीकडून दोन लाख, महापालिकेकडून एक लाख असे एकूण लाख रुपये मदत करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी घटनेस जबाबदार मक्तेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली नाही.
स्थायीत दुपारी ठराव
मक्तेदाराच्यानिष्काळजीपणामुळे पीयूष वळसंगकरचा मृत्यू झाला. मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत नगरसेवकांनी लक्षवेधीव्दारे हा विषय मांडला. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे, बिस्मिल्ला शिकलगर, नरसूबाई गदवालकर, मेघनाथ येमूल, अनिल पल्ली, चंद्रकांत रमणशेट्टी, भीमाशंकर म्हेत्रे आदींनी शहरातील खड्ड्यांची परिस्थिती सांगून प्रशासना समोर मांडली. त्यानंतर पियूषच्या कुटूंबियांना मक्तेदाराकडून पाच लाख तर महापालिकेकडून दोन लाख रुपये मदत देण्याचा ठराव एकमताने करण्यात आला.
सायंकाळीमहापौर कक्षात घडलेल्या घडामोडी-
पीयूषवळसंगकर याच्या मृत्यू प्रकरणी महापाैर सुशिला आबुटे यांनी सायंकाळी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर आबुटे यांनी पियूष कुटुंबियांला लाखाची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. यात मक्तेदार -५, सर्व्हेक्षण कंपनी -२ आणि महापालिका -१ असे लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. स्थायीने महापालिकेकडून दोन लाख ठरवले होते सायंकाळी ते आयुक्तांना विचारून लाख झाले. मात्र सायंकाळी सर्व्हेक्षण कंपनीचे दोन लाख वाढवण्यात आले. मक्तेदारांकडून मदत मिळतेय हे चांगले आहे. मात्र त्याच्यावर कारवाई काय करणार असा प्रश्न विचारले असता, पदाधिकाऱ्यांनी “ही बैठक सहानुभूतीची होती कारवाईची नाही’, असे उत्तर देण्यात आले.

पोलिसांनीचएक पाऊल पुढे टाकावे
महापालिकेच्या पत्राची वाट बघता अधिकारी यांना स्वत: महापालिकेत जाऊन नावाची चौकशी करून नाव समोर अाणावेत. मुलाचा निष्पाप बळी गेला अाहे. अाज अामचे गेले अाहे. उद्या कुणाचे मूल जाऊ नये यासाठी मनपा-पोलिस प्रशासनाने तत्काळ पावले उचलून ड्रेनेज दुरुस्ती करावी. ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी प्रसाद वळसंगकर यांनी केली. दरम्यान, महपालिका अायुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मंगळवारी सिंधू विहार काॅलनी घटनास्थळाची पाहणी केल्याचे सांगण्यात अाले.

सोलापूर विजापूररस्ता सिंधू विहार काॅलनीच्या पाठीमागील ड्रेनेज खड्ड्यात बुडून पीयूष वळसंगकर (वय १३) या शाळकरी मुलाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. सोमवारी महापालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला अाहे. मुख्य ठेकेदार कोण अाहे त्याचे नाव पोलिसांना शोधण्यात मंगळवारीही अपयश अाले. दरम्यान, सोमवारीच महापालिकेला पत्र देण्यात अाले अाहे. मंगळवारीही त्यांचे उत्तर अाले नाही. नाव समोर अाल्यानंतर लागलीच अापण कारवाई करू, असे पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी सांगितले.

स्थायीतील सूचना
शाळा,कॉलेजसमोरील खड्डे त्वरित बुजवा, ड्रेनेज काम तातडीने पूर्ण करा, खड्ड्यातील पाण्याचा निचरा करा, मोठे खड्डे ठिकाणी वॉचमन नेमा, खोदाई ठिकाणी बॅरिकेट, फलक लावा, मक्तेदाराच्या नावानिशी गुन्हा दाखल करा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, १० दिवसात अहवाल सादर करा.
मक्तेदार, सर्वेक्षण कंपनी, महापालिकेकडून मदत

बातम्या आणखी आहेत...