आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता आराखडा; एजन्सी नियुक्तीला भाजपचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आसराचौक ते विजापूर रोड पर्यंत सुमारे अडीच कि.मी.चा रस्ता तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्ती करण्यास मनपा स्थायी समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनीच विरोध दर्शविला. आमदार सुभाष देशमुख यांनी रस्त्यासंदर्भातील सूचना केलेली आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्याचा विषय स्थायी समितीपुढे आला होता. सत्ताधाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली पण भाजपने उपसूचना मांडली.
स्थायी समितीची सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सभा झाली. बोअर दुरुस्ती करणे, फय्याज शेख नागराज मंजुळे यांच्या सत्कार कार्यक्रमास १.८९ लाखांच्या कामास मंजुरी देण्यात आली. ७० घंटागाड्या खरेदीबाबतच्या विषयात त्रुटी असल्याने दुबार करण्याचा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती पक्षनेते बाबा मिस्त्री यांनी दिली.

आमदार देशमुख यांनी सूचवलेल्या रस्त्याच्या कामाचा आराखडा करण्यास दहा लाख रुपये खासगी कंपनीस देण्यास नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी विरोध केला. या विषयावर सुमारे तासभर स्थायीत चर्चा झाली. परंतु याबाबत भाजप पक्षनेते चंद्रकांत रमणशेट्टी यांना याबाबत ठोसपणे काही सांगता आले नाही. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यामधील त्रुटी सांगत जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रास मनपाने केराची टोपली दाखवली असे सांगितले, असे चंदनशिवे म्हणाले.